Voter List Revision : श्रीगोंद्यात मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहीम सुरू; ‘बीएलओ’ थेट मतदारांच्या दारी

विवाहित महिलांच्या माहेरच्या माहितीचीही होणार तपासणी

0
Voter List Revision : श्रीगोंद्यात मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहीम सुरू; 'बीएलओ' थेट मतदारांच्या दारी
Voter List Revision : श्रीगोंद्यात मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहीम सुरू; 'बीएलओ' थेट मतदारांच्या दारी

Voter List Revision : श्रीगोंदा : निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आदेशानुसार श्रीगोंदा तालुक्यात मतदार यादी अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी ‘मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम’ (Voter List Revision) युद्धपातळीवर सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेसाठी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून, आता हे कर्मचारी थेट मतदारांच्या दारात पोहोचणार आहेत. प्रशासनाच्या या मोहिमेची माहिती देत तहसीलदार सचिन डोंगरे (Sachin Dongre) यांनी नागरिकांना यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

नक्की वाचा : आंदोलनासाठी अण्णा हजारेंवर संघटनांचा दबाव; सरकारकडून प्रतिसाद नाही, पाठविले स्मरणपत्र

विवाहित महिलांच्या माहेरच्या माहितीचीही होणार तपासणी

या मोहिमेदरम्यान निवडणूक कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक घरात जाऊन मतदारांच्या नावांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल. तसेच पात्र नागरिकांना नवीन नोंदणीसाठी ‘ फॉर्म’ देखील दिले जाणार आहेत. ‘बीएलओ’कडून येणाऱ्या फॉर्मवर मतदारांना स्वतःची सही किंवा अंगठा करावा लागेल. या अर्जासोबत मतदारांचे दोन पासपोर्ट साईझ फोटो जोडणे बंधनकारक आहे. भरलेल्या अर्जांपैकी एक फॉर्म मतदाराला स्वतःकडे ठेवायचा असून दुसरा फॉर्म ‘बीएलओ’कडे जमा करायचा आहे. जो मतदार हा फॉर्म भरून देणार नाही, त्याचे नाव मतदार यादीत येणार नाही. या मोहिमेत नावांमधील चुका, पत्ता आणि इतर दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. तसेच विवाहित महिलांच्या माहेरच्या माहितीचीही तपासणी केली जाईल.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

‘बीएलओ’ कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन (Voter List Revision)

या पडताळणीमध्ये वय वर्ष ४० चा विशेष निकष ठेवण्यात आला आहे. ४० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना त्यांचे २००२ च्या मतदार यादीतील अनुक्रमांक आणि भाग क्रमांक सांगावा लागेल. तर ४० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मतदारांना त्यांच्या आई, वडील, आजी किंवा आजोबा यांपैकी एकाचा २००२ च्या यादीतील क्रमांक द्यावा लागेल. या संदर्भातील याद्या ‘बीएलओ’कडे उपलब्ध असणार आहेत. ही संपूर्ण पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक विभागाकडून अधिकृत ‘प्रारूप मतदार यादी’ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या दारात येणाऱ्या ‘बीएलओ’ कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सचिन डोंगरे यांनी केले आहे.