Kotwali police station : नगर : केडगाव परिसरात तलवार व लोखंडी कोयता बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला कोतवाली पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. त्याच्याकडून तलवार व लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali police station) गुन्हा दाखल (Case registered) करण्यात आला आहे. सोमनाथ राजेंद्र गंगतीरे (वय २७, रा. समतानगर, केडगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
नक्की वाचा : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून ‘अ’ दर्जा
पथकाची तत्काळ घटनास्थळी धाव
कोतवाली पोलिसांचे गुन्हे शोध पथक सोमवार (ता. २९) वटसावित्री पौर्णिमेनिमित्त शहरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना केडगाव देवी मंदिरामागील समतानगर परिसरात एक तरुण हातात तलवार घेऊन फिरत असल्याची व परिसरात दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत सोमनाथ राजेंद्र गंगतीरे (वय २७, रा. समतानगर, केडगाव) याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या राहत्या घराच्या बाहेरील परिसराची झडती घेतली असता एक तलवार आणि लोखंडी कोयता आढळून आला. दोन्ही हत्यारे जप्त करून गंगतीरे याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंदे करीत आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यांच्या पथकाने ही कारवाई केली (Kotwali police station)
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, रोहिणी दरंदले, राहुल शिंदे, बाळकृष्ण दौंड, विनोद बोरगे, साबीर शेख, विशाल दळवी, दिपक रोहकले, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरदे, रमेश शिंदे, अतुल काजळे, अमोल गाडे, सुरज कदम, सत्यम शिंदे, अतुल लाटे, सचिन लोळगे, संकेत धिवर, महेश पवार, पल्लवी रोहकले, राहुल गुंड, यांच्या पथकाने केली आहे



