
Balrangbhumi Parishad : महाराष्ट्रातील बालकलाकारांच्या (Child Artist) कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आणि राज्यभरात बालनाट्य चळवळ गतिमान करणाऱ्या बालरंगभूमी परिषदेची (Balrangbhumi Parishad) वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २८ जून २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व शाखांचे पदाधिकारी व सभासदांच्या उपस्थितीत सिद्धी साज बँक्वेट्स हॉल, पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के- सामंत (Adv. Nilam Shirke-Samant) होत्या. यावेळी २०२६- २७ च्या कार्यकाळासाठी मध्यवर्ती कार्यकारणीत काही बदल करण्यात आले.

सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मानाचे स्थान
अहिल्यानगर शाखेच्या सांस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मध्यवर्ती पातळीवर मानाचे स्थान मिळाले असून देवीप्रसाद सोहोनी यांची मध्यवर्ती कार्यकारी मंडळात निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच युथ टीमच्या राज्य महिला संघटकपदी तेजा पाठक यांची तर तेजस अतितकर यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रकाश पारखी (प्रमुख सल्लागार), राजीव तुलालवार(कार्याध्यक्ष), ॲड. शैलेश गोजमगुंडे(उपाध्यक्ष), डॉ.दीपा क्षीरसागर(उपाध्यक्ष), सतीश लोटके(प्रमुख कार्यवाह), योगेश शुक्ल (प्रभारी, प्रमुख कार्यवाह), नंदकिशोर जुवेकर (कोषाध्यक्ष) आसेफ शेख, दिपाली शेळके (सहकार्यवाह), अनंत जोशी (कार्यकारिणी सदस्य) आदी मध्यवर्तीचे पदाधिकारी उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नियुक्तीबद्दल करण्यात आले अभिनंदन (Balrangbhumi Parishad)
बालरंगभूमी परिषदेचे मुख्य उद्दिष्ट मनोरंजनातून प्रबोधन करणे असून फक्त नाटय क्षेत्राशी संबंधित न राहता नृत्य, गायन, वादन, लोककला इत्यादी कला प्रकारच्या प्रचार आणि प्रसारासाठी कटिबध्द आपण आहोत. सोशल मीडियाच्या जगात हे कार्य अधिक गतिमान करण्यासाठी आणि तरुण पिढीचे विचार “डिजिटल टच सह” सर्व वयोगटातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युथ टीम प्रभावीपणे कार्य करेल अशी अपेक्षा अध्यक्षा ॲड. निलम शिर्के- सामंत यांनी यावेळी व्यक्त केली. या नियुक्तीबद्दल तिन्ही रंगकर्मींचे परिषदेचे अध्यक्ष प्रसाद भणगे, प्रमुख कार्यवाह शैलेश देशमुख यांसह सागर अलचेट्टी, सोनाली दरेकर, प्रशांत सूर्यवंशी, विराज अडगटला, सपना साळुंके, सुजाता पायमोडे, टीना इंगळे, श्रिया देशमुख, ऋतुजा पाठक यांनी अभिनंदन करीत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


