Swami Govinddeogiri | श्रीराम मंदिरातील घटना वेदनादायी : स्वामी गोविंददेवगिरी

0

Swami Govinddeogiri  | श्रीरामपूर : अयोध्येतील श्रीराम मंदिरात काही दिवसांपूर्वी घडलेली घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून रामभक्तांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास कटिबद्ध असल्याचे न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी ( Swami Govinddeogiri ) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. 

हे वाचा – मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी घरोघरी भेटी सुरू; नागरिकांनी सहकार्य करावे : सुधीर पाटील

कायदेशीर कार्यवाही सुरू ( Swami Govinddeogiri )

प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, या घटनेमुळे देशभरातील रामभक्तांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत न्यासाचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचे राजीनामे सादर केले असून, त्याबाबतचा अंतिम निर्णय विश्वस्त मंडळाच्या आगामी बैठकीत घेतला जाणार आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने विशेष चौकशी समिती (एसआयटी) नियुक्त केली असून, समितीकडून सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहितीही प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. 

नक्की पहा : ६ लाख प्रामाणिक शिक्षकांच्या भविष्याशी खेळ! TET पेपर चक्क प्रिंटिंग प्रेसमधूनच लीक?

अधिकृत माहितीलाच महत्त्व ( Swami Govinddeogiri )

रामभक्तांनी कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितींवर विश्वास ठेवू नये, संयम राखावा आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे, असे आवाहन स्वामी गोविंददेवगिरी यांनी केले आहे. तसेच, या प्रकरणात पारदर्शक आणि न्यायपूर्ण चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची ग्वाहीही न्यासाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here