Shrigonda Police Station : विनापरवानगी डीजे वाजवणाऱ्यांवर पोलिसांची कडक कारवाई; श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Shrigonda Police Station : विनापरवानगी डीजे वाजवणाऱ्यांवर पोलिसांची कडक कारवाई; श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

Shrigonda Police Station : नगर : श्रीगोंदा शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशांचे पालन करण्यासाठी श्रीगोंदा पोलिसांनी डीजे साऊंड सिस्टीम धारकांवर धडक कारवाई केली आहे. लग्न समारंभ दरम्यान शासनाने ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे डीजे वाजवणाऱ्यांवर कारवाई (Action against those playing DJ music illegally) करण्यात आली आहे.

पूर्वपरवानगी न घेता डीजे साऊंड सिस्टीम लावली

श्रीगोंदा पोलीस ठाणे (Shrigonda Police Station) हद्दीत अनेक ठिकाणी रात्री १० वाजेनंतरही मोठ्या आवाजात डीजे सुरू असतात. श्रीगोंदा शहरामध्ये आज स्थानिक पोलीस प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता डीजे साऊंड सिस्टीम लावली गेली होती. विनापरवानगी आणि मानवी जीवाला त्रास होईल अशा तीव्र आवाजात चालणारे डीजे संच आणि संबंधित साहित्य पोलिसांनी जागीच जप्त केले आहे. संबंधित डीजे चालक आणि आयोजकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलीसांचे नागरिकांना व डीजे चालकांना आवाहन (Shrigonda Police Station)

राज्यात अनेक ठिकाणी डीजेच्या आवाजाने हार्ट अटॅक सारखे प्रकार घडवून जीवित हानी झाल्याच्या अप्रिय घटना घडलेल्या आहेत. वयोवृद्ध, महिला, बालके यांना डीजे च्या कर्ण कर्कश आवाजाचा त्रास होतो. सार्वजनिक कार्यक्रमासाठी व लग्न समारंभ याकरिता कोणीही डी.जे.चा वापर करू नये, लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमासाठी पारंपारिक वादयाचा वापर स्थानिक पोलीस ठाण्याची रीतसर परवानगी घेऊन करावा, असे आवाहन श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.