Waki Lake overflowed : पावसाचा जोर वाढला; वाकी तलाव ओव्हरफ्लो

Waki Lake overflowed : पावसाचा जोर वाढला; वाकी तलाव ओव्हरफ्लो

0
Waki Lake overflowed : पावसाचा जोर वाढला; वाकी तलाव ओव्हरफ्लो
Waki Lake overflowed : पावसाचा जोर वाढला; वाकी तलाव ओव्हरफ्लो

Waki Lake overflowed : अकोले : तालुक्यातील प्रवरा (Pravara River) व मुळा नदी खोऱ्यात पावसाचा जोर वाढल्याने ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. पाणलोट क्षेत्रात सर्वत्र समाधानकारक पाऊस होत असल्याने लघुपाटबंधारे प्रकल्प (Minor Irrigation Project) आणि तलाव भरू लागले असून जलसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. कृष्णावंती नदीवरील ११२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा वाकी तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो (Waki Lake overflowed) झाला आहे.

निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यातही वेगाने वाढ

निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील तसेच प्रवरा नदीची उपनदी असलेल्या कृष्णावंती नदीवरील वाकी तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. तलावातून ओसंडून वाहणारे पाणी प्रवरा नदीत मिसळत असल्याने निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होण्यास मदत होणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण (Waki Lake overflowed)

सोमवारी तालुक्यात अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पावसाचा हा जोर कायम राहिल्यास भात आवणीच्या कामांना लवकर गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणे आणि तलावांच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने बळीराजालाही मोठा दिलासा मिळाला आहे.