Online Application : नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आयडीसाठी १७ जुलैपर्यंत मुदत; जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायत क्षेत्रात जागा रिक्त

0
Online Application : नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आयडीसाठी १७ जुलैपर्यंत मुदत; जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायत क्षेत्रात जागा रिक्त
Online Application : नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आयडीसाठी १७ जुलैपर्यंत मुदत; जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायत क्षेत्रात जागा रिक्त

Online Application : नगर : जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली मिळवून देणाऱ्या ‘आपले सरकार सेवा केंद्रांचा’ विस्तार करण्यासाठी प्रशासनाकडून पावले टाकली जात आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रात नवीन आपले सरकार सेवा केंद्र आयडी प्रदान करण्यासाठी यापूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतींमध्ये एकही ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या रिक्त राहिलेल्या जागांवर पात्र व्यक्तींना काम करण्याची संधी मिळावी म्हणून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. या रिक्त जागांसाठी आता १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे सदस्य सचिव दादासाहेब गिते यांनी केले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

इथे करा अर्ज…

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या रिक्त जागांसाठी ८ जुलै ते १७ जुलै २०२६ या कालावधीत https://ahilyanagaraaplesarkar.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येतील. या अर्जासाठी आवश्यक असणाऱ्या अटी व शर्ती यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मुख्य जाहिरातीनुसारच लागू राहणार आहेत. विहित मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे.

नक्की वाचा : साकुरी येथे खरीप पीक विमा २०२६ योजनेचा प्रारंभ; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने घेतला लाभ

इथल्या जागा रिक्त (Online Application)

जिल्ह्यात सर्वाधिक रिक्त जागा अकोले तालुक्यात असून तेथे ३३ ग्रामपंचायतींमध्ये एकही अर्ज आलेला नाही. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यात १५, पारनेरमध्ये ७, जामखेड व पाथर्डी तालुक्यात प्रत्येकी ६, राहुरीत ५, तर अहिल्यानगर आणि कोपरगाव तालुक्यात प्रत्येकी ४ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. याशिवाय कर्जत, नेवासा, शेवगाव आणि श्रीरामपूर तालुक्यात प्रत्येकी २, तर श्रीगोंदा तालुक्यात १ अशा एकूण ८८ ग्रामपंचायतींमध्ये जागा रिक्त आहेत. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि पात्र व्यक्तींसाठी स्वयंरोजगाराची ही एक उत्तम संधी असून, नागरिकांनी आपल्या गावाची रिक्त जागा तपासून मुदतीपूर्वी अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.