Revenue Dept. : शर्तभंग नियमानुकूलतेबाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय; शेतजमीन धारकांना दिलासा

0
Revenue Dept. : शर्तभंग नियमानुकूलतेबाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय; शेतजमीन धारकांना दिलासा
Revenue Dept. : शर्तभंग नियमानुकूलतेबाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय; शेतजमीन धारकांना दिलासा

Revenue Dept. : नगर : राज्यातील जमीनधारकांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अंतर्गत मिळालेल्या जमिनींच्या शर्तभंगाबाबत महसूल विभागाने अत्यंत दिलासादायक स्पष्टीकरण परिपत्रकाद्वारे जारी केले आहे.

नक्की वाचा : डांबरी रस्त्यावर डागडुजी करताना टाकला मुरूम; गटाराची पाईपलाईन फुटल्याने घाण पाणी रस्त्यावर

नवीन नियम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार, संबंधित शेतजमिनीचे भूतकाळात कितीही वेळा खरेदी-विक्री व्यवहार झाले असले, तरीही आता केवळ शेवटचा शर्तभंग विचारात घेऊन तो नियमित केला जाईल.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शेतकऱ्यांना दिलासा (Revenue Dept.)

या निर्णयामुळे चालू जमीनधारकांवर पूर्वीच्या जुन्या शर्तभंगांचा कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. महसूल विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या महसूल प्रकरणांचा निपटारा वेगाने होईल आणि लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.