Revenue Dept. : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात चांडगाव–हिरडगाव शिवरस्त्यावरील सुमारे ३.५ कि.मी. मार्गाचे यशस्वी सीमांकन करून अतिक्रमण हटविण्यात आले. महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे १५ ते २० फूट रुंदीचा शिवरस्ता आता शेतकऱ्यांसाठी वाहतुकीस खुला झाला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यांचा पुढाकार
मुख्यमंत्री बळीराजा शिवपाणंद रस्ते योजना अंतर्गत तहसीलदार सचिन डोंगरे व भूमी अभिलेख अधीक्षक अविनाश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
नक्की वाचा : डांबरी रस्त्यावर डागडुजी करताना टाकला मुरूम; गटाराची पाईपलाईन फुटल्याने घाण पाणी रस्त्यावर
डोळ्यांत आनंदाश्रू (Revenue Dept.)
“२० वर्षांनंतर पहिल्यांदाच माझी मोटारसायकल शिवरस्त्याने थेट घरापर्यंत पोहोचली… सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले!” अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याची व्यक्त केली. शिवरस्ते हे केवळ वाहतुकीचे मार्ग नाहीत, तर शेतकऱ्यांच्या विकासाचा, सुलभ शेतीचा आणि ग्रामीण समृद्धीचा मजबूत पाया आहेत.



