Protest : गुन्हेगारी विरोधात श्रीरामपुरात सर्वपक्षीय मोर्चा; सलग चौथ्या दिवशी कडकडीत बंद

0
Protest : गुन्हेगारी विरोधात श्रीरामपुरात सर्वपक्षीय मोर्चा; सलग चौथ्या दिवशी कडकडीत बंद
Protest : गुन्हेगारी विरोधात श्रीरामपुरात सर्वपक्षीय मोर्चा; सलग चौथ्या दिवशी कडकडीत बंद

Protest : नगर : श्रीरामपूर शहरातील तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या ‘श्रीरामपूर बंद’ला आज सलग चौथ्या दिवशी व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण शहरातील बाजारपेठा आणि व्यवहार आज सलग चौथ्या दिवशीही पूर्णपणे ठप्प होते. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आणि शहरातील संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी आज (ता. १५) श्रीरामपूर शहरात एक भव्य सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो नागरिक, व्यापारी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते.

नक्की वाचा : डांबरी रस्त्यावर डागडुजी करताना टाकला मुरूम; गटाराची पाईपलाईन फुटल्याने घाण पाणी रस्त्यावर

आरोपींवर ‘मकोका’ लावा

या प्रकरणी श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “आकाश दुबैया यांच्या हत्येमागे असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळीचा पोलिसांनी समूळ उच्चाटन केले पाहिजे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह सर्व आरोपींवर तात्काळ ‘मकोका’ (MCOCA – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी,” अशी आग्रही मागणी आमदार ओगले यांनी यावेळी केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नागरिकांमध्ये संताप (Protest)

तरुण व्यवसायिकाची भरदिवसा झालेल्या हत्येमुळे श्रीरामपूरकरांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी मोहीम उघडून कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.