Tanpure : नगर-मनमाड रस्त्याची आठवडाभरात काम पूर्ण करण्याचे आश्वासन; आमदार तनपुरेंकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

0
Tanpure : नगर-मनमाड रस्त्याची आठवडाभरात काम पूर्ण करण्याचे आश्वासन; आमदार तनपुरेंकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती
Tanpure : नगर-मनमाड रस्त्याची आठवडाभरात काम पूर्ण करण्याचे आश्वासन; आमदार तनपुरेंकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

Tanpure : नगर : अहिल्यानगर-मनमाड रस्त्याच्या नवीन कामाची पहिल्याच पावसात अत्यंत दुरवस्था झाली आहे. राहुरी शहर, जोगेश्वरी आखाडा ते राहुरी कारखान्यापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नगरपरिषद सभागृहात अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, गुणवत्ता तपासणी करणारी कन्सल्टंट फर्म, मुख्य ठेकेदार भारत कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी, गट नेते हर्षदादा तनपुरे, नगरसेवक आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गंभीर चुका मान्य

बैठकीत आमदार तनपुरे आणि लोकप्रतिनिधींनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर अधिकाऱ्यांनी गंभीर चुका झाल्याचे मान्य केले. रस्त्याचा एक थर झाल्यानंतर त्यावर असणारा अंतिम आणि महत्त्वाचा बी. सी. लेयर वेळेत न टाकल्यामुळे खालच्या थराला मोठे खड्डे पडल्याचे कारण संबंधित यंत्रणेने दिले. या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त करत याला जबाबदार कोण आणि निकृष्ट कामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला कोण उत्तर देणार, असा सवाल आमदार तनपुरे यांनी उपस्थित केला.

नक्की वाचा : डांबरी रस्त्यावर डागडुजी करताना टाकला मुरूम; गटाराची पाईपलाईन फुटल्याने घाण पाणी रस्त्यावर

अधिकाऱ्यांचे आश्वासन (Tanpure)

रस्त्याची स्थिती पाहता भविष्यात अपघात होऊ नये, ही पहिली प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठेकेदाराचे पेमेंट थांबवणे किंवा कारवाई करणे हा पुढचा भाग असला तरी तातडीने रस्ता दुरुस्त होणे गरजेचे आहे. त्यानुसार पुढील पावसाचा जोर सुरू होण्यापूर्वी आठवडाभरात एका बाजूचे सर्व लेयर पूर्ण करून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे आश्वासन ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी दिले आहे.