
नगर : आपण पांडुरंगाकडे एकच विनंती करु, विठ्ठलाला साकडं घालू की, योग्यवेळी देवा भाऊंना देशाचे नेतृत्व करण्याची संधी (An opportunity to lead the country) मिळावी, असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne on Fadnavis) यांनी केलं आहे. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या किसान मोर्चाच्या वतीने सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नक्की वाचा : शेतकऱ्यांचे वीजबील माफ होणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
चांगली माणसं महाराष्ट्रातच राहिली पाहिजे, आपल्या भविष्यासाठी ते महाराष्ट्रातच राहिले पाहिजेत. पण, फक्त आपलाच विचार करुन चालत नाही साहेब. आता, २५ तारखेला आषाढी एकादशी आहे, आपण पांडुरंगाकडे एकच विनंती करु, विठ्ठलाला साकडं घालू की, योग्यवेळी देवा भाऊंना देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले. भरणे यांच्या या वक्त्वव्याने उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
अवश्य वाचा : १०० टक्के पेट्रोल मिळणार पण…;नितीन गडकरी यांचे मोठे विधान
‘शेतकरी उभा राहिला पाहिजे’ (Dattatray Bharne on Fadnavis)

किसान मोर्चाचे आपण कार्यकर्ते आहात, महायुतीत आपण एकत्र आहोत. सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी हा सन्मान आपण घेतला आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी आली, पिकं वाहून गेलं, अशात आपल्याला कोणी मदत केली असेल तर ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आज अजित दादा नाहीत. मात्र त्यांनी तेव्हा फिल्डवर जात नुकसानीची पाहणी केली होती. बोलणं सोपं पण करणं अवघड असतं. आपण संसार चालवतो, तेव्हा सगळा विचार करावा लागतो, निवडणुका नाहीत मात्र मदत केली पाहिजे, तो शेतकरी उभा राहिला पाहिजे, यासाठी देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मदत केल्याचं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.
‘शेतकरी हिताचे निर्णय घेतले’ (Dattatray Bharne on Fadnavis)
महायुतीच्या कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे, कर्जमाफीचा निर्णय जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची, रक्कम ४० हजार ५८५ कोटी रुपये झाली आहे. आपल्यासाठी काम करतात त्यांचे ऋण व्यक्त केले पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी बळीराजासाठी मोठी मदत केली, प्रत्येक वर्षी वीजेसाठी ७.५ हॉर्स पंपासाठी दरवर्षी आपण २५ हजार कोटींची मदत करतोय, मदत करणं सोपं नाही आहे हे बाबांनो,असे म्हणत दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक केले. तसेच ९० टक्के मार्क मिळाले तरी १० टक्के कमी का मिळाले यासाठी प्रचार केला जातोय.
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले पाहिजे, एआयच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न आपण करतोय. महिला शेतकरी धोरण आणण्याचे काम आपल्या सरकारने केले आहे. नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना दोन्हींचा विचार केला तर आत्तापर्यंत राज्याने ५७ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले हे लोकांना सांगितलं पाहिजे, असेही भरणेंनी म्हटले.


