Local Crime Branch : नगर : अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई करत एमडी (Mephedrone) विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अटक (Arrest) केली. आरोपीकडून एमडी, रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकीसह २ लाख ५२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणातील मुख्य पुरवठादार अद्याप पसार आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित सोहेल जुबेर शेख (२७, रा. मिल्लतनगर, श्रीरामपूर) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून ४.८३ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), ६,२०० रुपये रोख, ५० हजार रुपयांचा मोबाईल आणि एक लाख रुपयांची दुचाकी असा एकूण २.५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नक्की वाचा : फिनिक्स फाऊंडेशनने हजारो वारकऱ्यांना पुरवली आरोग्यसेवा
सापळा रचून आरोपी ताब्यात
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथक श्रीरामपूर शहर परिसरात गस्त घालत होते. यावेळी गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर-संगमनेर मार्गावरील नांदूर शिवारातील अस्तगाव फाटा येथे सापळा रचण्यात आला. पथकाने संशयित सोहेल जुबेर शेख (२७, रा. मिल्लतनगर, श्रीरामपूर) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून ४.८३ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), ६,२०० रुपये रोख, ५० हजार रुपयांचा मोबाईल आणि एक लाख रुपयांची दुचाकी असा एकूण २.५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गुन्हा दाखल (Local Crime Branch)
प्राथमिक चौकशीत हा अंमली पदार्थ आसिफ मुनीर शेख (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) याच्याकडून आणल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. संबंधित आरोपी पसार असून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार, अतुल लोटके, बिरप्पा करमल, रिचर्ड गायकवाड, शामसुंदर जाधव, रमिजराजा आतार, विशाल तनपुरे, भगवान धुळे यांच्या पथकाने केली आहे.



