Stock Market Fraud : शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष; ५८ लाखांची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा

फसवणूक झाल्याचे आले लक्षात

0
Stock Market Fraud : शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष; ५८ लाखांची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा
Stock Market Fraud : शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष; ५८ लाखांची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा

Stock Market Fraud : नगर : शेअर मार्केटमध्ये (Stock Market) पैसे गुंतवल्यास मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल ५८ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : सलग दुसऱ्या दिवशी एलसीबीची धडक कारवाई; श्रीरामपुरात एमडी तस्कर जेरबंद

जादा नफा मिळवून देण्याचे आश्वासन

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन अजयकुमार कांकरिया आणि अभिनंदन अजयकुमार कांकरिया (दोघे रा. चिचोंडी पाटील, ता. जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी बालाजी अंबादास यनंदुर्गुल यांनी फिर्याद दाखल केली आहे. ऑगस्ट २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत फिर्यादींकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने एकूण ५८ लाख रुपये स्वीकारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

फसवणूक झाल्याचे आले लक्षात (Stock Market Fraud)

त्यानंतर गुंतविलेली रक्कम व परतावा मागितल्यानंतर आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.