job Fair : पाथर्डी येथे शनिवारी नोकरी मेळाव्याचे आयोजन

८६ कंपन्यांची सहभाग घेण्यास संमती

0
job Fair : पाथर्डी येथे शनिवारी नोकरी मेळाव्याचे आयोजन
job Fair : पाथर्डी येथे शनिवारी नोकरी मेळाव्याचे आयोजन

job Fair : पाथर्डी : केदारेश्वर कारखान्याचे (Kedareshwar Factory) माजी अध्यक्ष प्रताप ढाकणे (Pratap Dhakne) यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता.१८) नोकरी मेळावा आयोजित केला असून या मेळाव्याचा लाभ नोकरी करू इच्छिणाऱ्या युवकांनी घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे (Shivshankar Rajale) यांनी पत्रकार परिषदेत केले.

नक्की वाचा : माऊली… माऊली’च्या अखंड गजरात बुरूडगाव पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

ऑनलाईन नोंदणी सुरू

यावेळी माजी नगरसेवक बंडुपाटील बोरुडे, नगरसेवक देवा पवार, बाळासाहेब सोनटक्के, सुरेश हंडाळ, योगेश रासने, दिगंबर गाडे, आक्रम आतार, शिवाजी बडे, एम पी आव्हाड, एन युवा हब कंपनीचे संचालक किरण रहाणे व दीपक पवार उपस्थित होते. या मेळाव्याविषयी माहिती देताना रहाणे व पवार म्हणाले की, या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांची ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असून आत्ता पर्यंत ४८० तरुणांनी नोंदणी केली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

८६ कंपन्यांची सहभाग घेण्यास संमती (job Fair)

दोन वर्षांपूर्वी असा मेळावा आयोजित केला होता, त्यावेळी सहाशे तरुणांना या मेळाव्यात नोकरी मिळाली होती. यावेळी होणाऱ्या मेळाव्यातून जवळपास एक हजार तरुणांना नोकरी मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. या मेळाव्यात आतापर्यंत ८६ कंपन्यांनी सहभाग घेण्यास संमती दिली आहे तर आणखी काही कंपन्यांनी सहभागी व्हावे, असा आमचा प्रयत्न चालू आहे. या मेळाव्यात आयटी, बँकिंग, फायनान्स, फार्मसी अशा विविध क्षेत्रातील कंपन्या सहभाग घेणार आहेत. याशिवाय टाटा, बजाज, महेंद्र,आय सी आय, एच डी एफ सी बँक अशा नामवंत कंपन्या सहभागी होणार असून जवळपास सात लाख रुपयापर्यंतचे पॅकेज पात्र उमेदवारांना दिले जाणार आहे.

दिव्यांगांना नोकरी देणार असल्याचे जाहीर

मेळाव्यात सहभागी झालेल्या काही कंपन्यांनी दिव्यांगांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले असून दिव्यांग उमेदवारांना संबंधित कंपनी तीन महिने मोफत प्रशिक्षण देणार आहे. या मेळाव्यात जास्तीतजास्त तरुणांनी सहभागी होऊन नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करावे. या मेळाव्यातून ज्यांना नोकरी मिळणार नाही, त्या उमेदवारांना जॉबकार्ड दिले जाणार असून पुढील सहा महिन्यात त्यांना सुद्धा नोकरी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.