Ashadhi Vari : आषाढी वारीत सहभागी शेवगावच्या तरुण वारकऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन

0
Ashadhi Vari : आषाढी वारीत सहभागी शेवगावच्या तरुण वारकऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन
Ashadhi Vari : आषाढी वारीत सहभागी शेवगावच्या तरुण वारकऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन

Ashadhi Vari : नगर : शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील ४५ वर्षीय तरुण वारकरी भारत मुरलीधर चित्ते यांचा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जात असताना वाटेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

नक्की वाचा : पाथर्डी येथे शनिवारी नोकरी मेळाव्याचे आयोजन

हृदयविकाराचा तीव्र झटका

भारत हे गायकवाड जळगाव येथून निघालेल्या दीपक महाराज भोसले यांच्या पाई पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. सोहळा दुसऱ्या दिवशी मार्गस्थ होत असताना, शिरूर कासार जवळ पालखीसोबत असलेल्या टेम्पोमध्ये जाऊन बसत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आर्थिक मदतिची मागणी (Ashadhi Vari)

त्यांना तात्काळ जवळच्या शिरूर कासार येथील दवाखान्यात व नंतर बीड येथे हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असा परिवार असून, या वारकरी भक्ताच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.