
Appeal : नगर : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना विहित कालमर्यादेत, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक विभागाने उत्तरदायित्व स्वीकारून काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्याने समन्वयाने आणि एकजुटीने काम करून जिल्ह्याची कामगिरी अधिक उंचावावी, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले.
नक्की वाचा : पाथर्डी येथे शनिवारी नोकरी मेळाव्याचे आयोजन
प्रमुख अधिकारी उपस्थित
पारनेर तहसील कार्यालयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत आयोजित तालुकास्तरीय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार गायत्री सैंदाने, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, मुख्याधिकारी प्रियांका शिंदे यांच्यासह तालुकास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तातडीने आवश्यक सुधारणा (Appeal)
राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी म्हणाल्या की, प्रत्येक विभागाने नागरिकांना किमान ९० टक्क्यांहून अधिक सेवा विहित कालमर्यादेत देण्याचे उद्दिष्ट साध्य करावे. ज्या विभागांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी आहे, त्यांनी त्यामागील कारणांचा अभ्यास करून तातडीने आवश्यक सुधारणा कराव्यात. जिल्ह्याचे राज्यातील आघाडीचे स्थान कायम राखण्यासाठी प्रत्येक विभागाने अधिक जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने काम करणे आवश्यक आहे.


