Husband arrested for wife’s murder : नगर : पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीला (Husband arrested for wife’s murder) नगर तालुका पोलिसांनी (Ahilyanagar Taluka Police Station) अवघ्या काही तासांत बीड सीमेवरून अटक केली. या प्रकरणी सुभाष रखमाजी खरात याच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबेमळा (बुरुडगाव) येथे भाड्याच्या घरात राहणारे सुभाष खरात व त्याची पत्नी मनिषा यांच्यात कौटुंबिक कारणावरून नेहमी वाद होत होते. शनिवारी (ता.१९) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादानंतर सुभाष याने मनिषाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिचे डोके भिंतीवर आपटल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. जखमी मनिषाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
सापळा रचून बीड सीमेवरून घेतले ताब्यात
घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा, पुरावे संकलन आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले. आरोपी फरार झाल्याचे समजताच त्याच्या संभाव्य पलायन मार्गांवर विशेष पथके रवाना करण्यात आली. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी बीडकडे पळून जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बीड सीमेवरून त्याला ताब्यात घेतले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
समन्वयाने पार पाडली कारवाई (Husband arrested for wife’s murder)
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, भरत धुमार, स.फौ. दत्तात्रय हिंगडे, स.फौ. रायचंद पालवे, पो.हे.कॉ. मंगेश खरमाळे, पो.हे.कॉ. नितीन शिंदे, चालक विकास शिंदे, पो.हे.कॉ. शिवाजी खरात तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडु व अरुण सांगळे यांनी अत्यंत तत्परतेने, समन्वयाने व कौशल्यपूर्ण पद्धतीने पार पाडली.



