Jamkhed : जामखेड पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्प गतीने पूर्ण करण्याचे निर्देश

0
Jamkhed : जामखेड पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्प गतीने पूर्ण करण्याचे निर्देश
Jamkhed : जामखेड पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्प गतीने पूर्ण करण्याचे निर्देश

Jamkhed : नगर : जामखेड शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा योजना व मलनिस्सारण प्रकल्पाची कामे विहित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. या प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्र व मलनिस्सारण प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करून नागरिकांना या सुविधांचा लवकर लाभ मिळेल, यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

नक्की वाचा : धर्मांतरानंतर अनुसूचित जातीचे लाभ मिळतील की नाही? सरकार घेणार मोठा निर्णय

हे उपस्थित

जामखेड नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेबाबत आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, मुख्याधिकारी अजय साळवे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

हे निर्देश (Jamkhed)

करमाळा येथून येणाऱ्या जलवाहिनीच्या उर्वरित कामाचा आढावा घेताना वनविभागाच्या परवानगीची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उर्वरित १२ किलोमीटर जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तत्काळ संबंधित विभागाकडे सादर करून कामाला अपेक्षित गती द्यावी, असे निर्देश देण्यात आले.