Local Crime Branch : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव (Kamargaon) परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने छापा टाकून तीन लाख ६९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात आठ संशयीतां विरोधात गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
चंद्रभान जयसिंग खोडवे (वय ४५, रा. कामरगांव, ता. जि. अहिल्यानगर), सोहम संदीप भिंगारदिवे (वय २१), भाऊसाहेब जनार्धन ठोकळ (वय ५५), मनोज नाना झरेकर वय ४१, सर्व रा. कामरगांव, ता. जि. अहिल्यानगर), किरण शाम भालके वय ३५, रा. पिंपळगांव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), शिवाजी दत्तात्रय दिवेकर वय ४४, रा. यशवंत कॉलनी, ता. शिरुर, जि. पुणे), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गुन्हा दाखल (Local Crime Branch)
चंद्रकांत नागनाथ दांदेवाड, रा. केडगांव, ता. जि. अहिल्यानगर) (पसार) असे असल्याचे समजले आहे. तसेच हा जुगार अड्डा चालविणारा गोरक्ष दिलीप कातोरे रा. कामरगांव, ता. जि. अहिल्यानगर), असे निष्पन्न झाले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. संशयित आरोपींकडून जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने, मोबाईल, वाहने असा एकुण तीन लाख ६९ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा रचून छापा टाकला
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळालेल्या माहितीनुसार कामरगाव परिसरात तिरट नावाचा जुगार खेळवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला. यावेळी किरण नावाचा जुगार खेळणारे सहा संशयित आरोपींकडून तीन लाख ६९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, पोलीस अंमलदार विष्णु भागवत, विजय पवार, सोमनाथ झांबरे, भिमराज खर्से प्रकाश मांडगे, भगवान धुळे यांच्या पथकाने केली आहे.



