Nationwide Educational Shutdown : अकोले : दिल्लीतील जंतर-मंतर (Jantar Mantar in Delhi) येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२४) पुकारण्यात आलेल्या देशव्यापी शैक्षणिक बंदला (Nationwide Educational Shutdown) अकोले तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अगस्ति महाविद्यालयासह शहरातील विद्यार्थ्यांनी शिक्षण बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा
यावेळी विद्यार्थ्यांनी अगस्ति महाविद्यालय ते अकोले एसटी बसस्थानक असा मोर्चा काढत दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विविध संघटनांनी घेतला पुढाकार (Nationwide Educational Shutdown)
या आंदोलनासाठी एस.एफ.आय. (स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया), छात्रभारती आणि डी.वाय.एफ.आय. (डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया) या संघटनांनी पुढाकार घेतला होता. मोर्चाचे नेतृत्व डॉ. अजित नवले, विशाल शिंदे, गणेश ताजणे, सदाशिव साबळे, अच्युत वैद्य, विशाल बोऱ्हाडे, तेजस्विनी माघाडे, अवधूत नवले, श्रीपाद डावरे, शीतल झोळेकर, सुनंदा मेढे, यूवराज भांगरे आदींनी केले.
आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत पुढील टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यासाठी तालुक्यातील सर्व विद्यार्थी संघटनांची संयुक्त बैठक घेऊन अकोले शहरासह कोतूळ, राजूर, समशेरपूर आदी भागातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची व्यापक एकजूट निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.



