Mamachya Govyala Jauya : ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

Mamachya Govyala Jauya : ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

0
Mamachya Govyala Jauya : ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित
Mamachya Govyala Jauya : ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

Mamachya Govyala Jauya : गोव्याच्या (Goa) ट्रिपला निघालेल्या संत्या, बाबा, कुश्या आणि त्यांच्या लाडक्या मामाची धमाल टीझरमधून प्रेक्षकांनी अनुभवली होती. मात्र आता प्रदर्शित झालेल्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ (Mamachya Govyala Jauya) च्या ट्रेलरने या धमाल प्रवासाला सस्पेन्स, अॅक्शन आणि अनपेक्षित ट्विस्ट्सची भन्नाट जोड दिली आहे. ट्रेलरच्या (Trailer) अखेरीस दिसणारा मामाचा धक्कादायक डॉन अवतार हा नेमका खरा आहे की, त्यामागे आणखी काही रहस्य दडलंय, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण करत ट्रेलर चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढवतो.

निरागस मामा एका क्षणात डॉनच्या अवतारात

ट्रेलरची सुरुवात गोव्याच्या मजेशीर ट्रिपने होते. संत्या, बाबा, कुश्या आणि मामा यांची भन्नाट केमिस्ट्री, त्यांच्या धमाल गंमती-जंमती आणि सतत ओढवणारे गोंधळ पाहात असतानाच कथा अचानक वेगळ्याच वळणावर पोहोचते. अंकुश चौधरी साकारत असलेला साधा, भोळाभाबडा आणि निरागस मामा एका क्षणात डॉनच्या अवतारात समोर येतो आणि ट्रेलरचा संपूर्ण रंगच बदलून जातो.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

एकामागून एक धक्कादायक ट्विस्ट् (Mamachya Govyala Jauya)

यानंतर सुरू होतो पाठलाग, अॅक्शन, जबरदस्त कॉमिक टायमिंग आणि एकामागून एक धक्कादायक ट्विस्ट्सचा खेळ. मामा नेमका कोण आहे? तो खरंच डॉन आहे की या सगळ्यामागे आणखी काही मोठं रहस्य दडलं आहे? या प्रश्नांची उत्तरं मात्र चित्रपटगृहातच मिळणार आहेत. गोव्याच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर मैत्री, विनोद, थरार आणि अॅक्शनचा भन्नाट संगम ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो.

कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी यांची अफलातून केमिस्ट्री हा ट्रेलरचा मोठा प्लस पॉइंट ठरते. त्यांच्यातील संवाद, टायमिंग आणि धमाल प्रसंग प्रेक्षकांना खळखळून हसवतात. त्याचबरोबर महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, मकरंद अनासपुरे, मकरंद देशपांडे, अवधूत गुप्ते आणि प्रवीण तरडे यांच्या दमदार भूमिका चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढवतात. नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले यांचा ग्लॅमरस अंदाजही ट्रेलरमध्ये वेगळी रंगत आणतो.

दिग्दर्शक विजू माने म्हणतात, “‘स्ट्रगलर साला’मधील संत्या, बाबा आणि कुश्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. यावेळी त्यांच्या आयुष्यात मामा येतो आणि त्या चौघांचा प्रवास पूर्णपणे बदलून जातो. हा प्रवास जितका मजेशीर आहे तितकाच अनपेक्षितही आहे. प्रत्येक पात्राची स्वतःची एक वेगळी मजा आहे आणि प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांना हसवतानाच पुढे काय होणार, याची उत्सुकता कायम ठेवतो. ही गोव्याची ट्रिप प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.”

‘विजुमेनिया प्रा. लि.’ आणि ‘लाईट अँड शेड’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली असून पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांचे आहेत. ३१ जुलैपासून ही धमाल गोवा ट्रिप, रहस्य, मैत्री आणि मनोरंजनाचा फुल ऑन डोस घेऊन ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.