MY Bharat : मेरा युवा भारत व सीएसआरडी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नशा मुक्त भारत स्पर्धांचे आयोजन

MY Bharat : मेरा युवा भारत व सीएसआरडी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नशा मुक्त भारत स्पर्धांचे आयोजन

0

युवकांना कौशल्य सादर करण्याची सुवर्णसंधी

MY Bharat अहिल्यानगर :
भारत सरकारच्या (Government of India) युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत (MY Bharat) अहिल्यानगर व बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात युवा शक्ती – नशा मुक्त भारताची (Nasha Mukt Bharat Abhiyaan) शक्ती या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे, सर्जनशीलतेला चालना देणे आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना दृढ करणे हा आहे.

MY Bharat : मेरा युवा भारत व सीएसआरडी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नशा मुक्त भारत स्पर्धांचे आयोजन
MY Bharat : मेरा युवा भारत व सीएसआरडी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नशा मुक्त भारत स्पर्धांचे आयोजन

कलाकृतीतून मांडायचा व्यसनमुक्तीचा संदेश

या स्पर्धांचे आयोजन २९ जुलै २०२६ रोजी बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, अहिल्यानगर येथे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील सर्व युवक-युवती या स्पर्धांमध्ये वैयक्तिक अथवा गट स्वरूपात सहभागी होऊ शकतात. स्पर्धांमध्ये लोकगीत (संगीत), नृत्य, नुक्कड नाटक/माईम, चित्रकला, वादविवाद, लघुपट/रील, घोषवाक्य लेखन तसेच कविता/स्लॅम पोएट्री अशा विविध कला व साहित्य प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व स्पर्धांचा विषय नशा मुक्त भारत हा असून युवकांनी व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश आपल्या कलाकृतीतून मांडायचा आहे.

MY Bharat : मेरा युवा भारत व सीएसआरडी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नशा मुक्त भारत स्पर्धांचे आयोजन
MY Bharat : मेरा युवा भारत व सीएसआरडी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नशा मुक्त भारत स्पर्धांचे आयोजन

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची संधी मिळणार (MY Bharat)

स्पर्धेतील उत्कृष्ट विजेत्यांना अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी MY Bharat पोर्टलवर नोंदणी करून संबंधित विभाग निवडून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्ज सादर करावा, असे आवाहन सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे व तसेच मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजित संतोष यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे युवकांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार असून समाजात व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश पोहोचण्यास मदत होणार आहे. अधिक माहितीसाठी 9225776995 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.