LCB Action : अहिल्यानगरात अवैध धंद्यांवर एलसीबीचा धडक कारवाईचा बडगा; विविध पोलीस ठाण्यात १८ गुन्हे दाखल

LCB Action : अहिल्यानगरात अवैध धंद्यांवर एलसीबीचा धडक कारवाईचा बडगा; विविध पोलीस ठाण्यात १८ गुन्हे दाखल

0

LCB Action : नगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री (Illegal Liquor Sale) व जुगार अड्ड्यांविरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई (LCB Action) करत १८ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण १ लाख ५० हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अनेक ठाण्यांच्या हद्दीत एकाचवेळी धाडी

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी २७ जुलै रोजी कोतवाली, तोफखाना, सोनई, राहुरी, कर्जत आणि बेलवंडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाचवेळी धाडी टाकल्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अवैध जुगाराच्या ८ अड्ड्यांवर कारवाई (LCB Action)

या मोहिमेत अवैध दारू विक्रीच्या १० ठिकाणी तर अवैध जुगाराच्या ८ अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत एकूण १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोनई पोलीस ठाणे हद्दीत ५, राहुरी येथे २, बेलवंडी येथे २ आणि कर्जत येथे १ अशा एकूण १० गुन्ह्यांची नोंद झाली. या कारवाईत १ लाख २८ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर जुगार अड्ड्यांवर कारवाईकरत तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत ४ आणि कोतवाली येथे ४ अशा एकूण ८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये २१ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, विकास जाधव, कृष्णकुमार सेदवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील अवैध दारू विक्री, जुगार व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.