
Local Crime Branch : नगर : श्रीरामपूर शहरातील अवैध जुगार अड्डे आणि दारू विक्री(Illegal gambling dens and liquor sales) विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) धडक कारवाई करत तीन गुन्हे दाखल (Case registered) केले. या कारवाईत आठ आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले असून दोन आरोपी फरार आहेत. दरम्यान, रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे साहित्य, वाहने तसेच देशी-विदेशी मद्याच्या बाटल्यांसह एकूण १३ लाख ९७ हजार ८३५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड तसेच पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, शामसुंदर जाधव, भगवान थोरात, रमिझराजा आतार आणि विशाल तनपुरे यांच्या पथकाने श्रीरामपूर शहरात छापेमारी केली.
या कारवाईत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अरुण संजय बोरुडे, दिपक बाळासाहेब यादव आणि सचिन भैरव नवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर स्वामी परदेशी आणि अश्पाक जहागीरदार हे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत १ लाख ४५ हजार ९०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल (Local Crime Branch)
तर दुसऱ्या कारवाईत रविंद्र महादेव गायकवाड याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातही अश्पाक जहागीरदार हा फरार असून ७ लाख ३३ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये नितेश अमरीकलाल कंत्रोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या व वाहन असा ५ लाख १८ हजार ४३५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून आठ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.


