
Amol Kavitkar : नगर : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे सुपुत्र अमोल कविटकर यांची ‘दौरा समन्वयक माध्यम विभाग’ या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून याबाबतचे अधिकृत पत्र नुकतेच जारी करण्यात आले असून हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू झाला आहे. प्रदेशातील महत्त्वाचे दौरे, संघटनात्मक उपक्रम आणि माध्यम समन्वय अधिक गतिमान व प्रभावी करण्याच्या उद्देशाने ही धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

१२ वर्षांचा इलेक्ट्रॉनिक मीडियातील अनुभव अन् संघटन कौशल्य
राज्यभरातील दौऱ्यांचे सूक्ष्म नियोजन, प्रसारमाध्यमांशी उत्तम संवाद आणि संघटनात्मक कार्यक्रमांचे व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पक्षाने अमोल कविटकर यांच्यावर हा विश्वास दाखवला आहे. अमोल कविटकर यांना जनसंपर्क आणि माध्यम क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. २०२३ ते २०२६ या कालावधीत त्यांनी ‘पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख’ म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय, इलेक्ट्रॉनिक माध्यम क्षेत्रात बातमीदार ते ब्युरो चीफ अशा विविध पदांवर काम करण्याचा तब्बल १२ वर्षांचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या या तांत्रिक आणि संघटनात्मक अनुभवाचा फायदा पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी होणार आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगरात अवैध धंद्यांवर एलसीबीचा धडक कारवाईचा बडगा; २१ गुन्हे दाखल
विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव अन् पक्ष नेतृत्वाचे आभार (Amol Kavitkar)
या नियुक्तीनंतर भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि मित्र परिवाराकडून अमोल कविटकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे आणि संघटनात्मक कामे माध्यमांच्या साहाय्याने प्रभावीपणे मांडण्यात ते यशस्वी ठरतील, असा विश्वास सहकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. या नव्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अमोल कविटकर म्हणाले, “माझ्यावर पुन्हा एकदा मोठा विश्वास दाखवून ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ ही जबाबदारी दिल्याबद्दल मी भाजप प्रदेश नेतृत्वाचा मनापासून आभारी आहे. हा केवळ सन्मान नसून एक मोठी जबाबदारी आहे. नेतृत्वाचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, माध्यम समन्वय अधिक बळकट करण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मी पूर्ण समर्पित भावनेने व प्रामाणिकपणे कार्य करेन.”


