
Nilesh Lanke : नगर : खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेऊन अहिल्यानगर-शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे या राष्ट्रीय महामार्गांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्ह्यातील दळणवळण, पर्यटन आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विविध रस्ते प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली.
नक्की पहा : गुरुस्थान मंदिरात सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते रुद्राभिषेक; गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
कामाचा मुद्दा उपस्थित
या भेटीदरम्यान खासदार निलेश लंके यांनी प्रामुख्याने अहिल्यानगर-शिर्डी व छ. संभाजीनगर-पुणे या अत्यंत वर्दळीच्या महामार्गाच्या (NH 753-F) कामाचा मुद्दा उपस्थित केला. हे दोन्ही मार्ग पुणे आणि अहिल्यानगर या औद्योगिक पट्ट्याला जोडणारे मुख्य मार्ग असून, याच्या विस्तारामुळे शिर्डी, शनी शिंगणापूर आणि नेवासा या प्रमुख तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : अहिल्यानगरात अवैध धंद्यांवर एलसीबीचा धडक कारवाईचा बडगा; २१ गुन्हे दाखल
मतदारसंघातील रस्ते विकास (Nilesh Lanke)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार लंके यांनी मांडलेल्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या आणि अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले. या कामांमुळे जिल्ह्यातील दळणवळण सुधारेल आणि प्रादेशिक विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास या बैठकीनंतर व्यक्त करण्यात आला.


