Prashant Kishor Win : भाजपचा तीन दशकांचा अभेद्य गड भेदला; बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी

विजयासह बांकीपूर मतदारसंघावरील भाजपचे तब्बल 30 वर्षांचे वर्चस्व संपुष्टात 

0
Prashant Kishor Win : भाजपचा तीन दशकांचा अभेद्य गड भेदला; बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी
Prashant Kishor Win : भाजपचा तीन दशकांचा अभेद्य गड भेदला; बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी

Prashant Kishor Win : नगर : जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत (Assembly by-elections) दणदणीत विजय मिळविला आहे. प्रशांत किशोर यांनी भाजपला मोठा सुरूंग लावला आहे. या विजयासह बांकीपूर मतदारसंघावरील भाजपचे (BJP) तब्बल 30 वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. प्रशांत किशोर यांना तब्बल 19 हजारांनी मतांनी विजय मिळविला आहे.

नक्की वाचा : संगमनेर शहरात बनावट नोटांचा पर्दाफाश;  १२ लाख ४० हजारांच्या नोटा जप्त

राजकीय रणनीतीकार म्हणून देशभरात ओळख

राजकीय रणनीतीकार म्हणून देशभरात ओळख निर्माण केलेल्या प्रशांत किशोर यांनी जनसुराज पक्षाची स्थापना केली होती. मागील वर्षी बिहार विधानसभेसाठी सर्व जागांवर उमेदवार दिले होते. परंतु प्रशांत किशोर यांच्या पक्षाला अपयश आले. एकही उमेदवार निवडून आला नाही. मते ही अल्प मिळाले. एका अर्थाने बिहारी मतदारांनी प्रशांत किशोर यांना नाकारले होते. परंतु भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नितीन नबीन यांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर स्वत: रिंगणात उतरले. झंजावती प्रचार करत भाजपचा उमेदवाराचा तब्बल 19 हजारांनी मतदांनी पराभव करत विजय मिळविला आहे. या यशामुळे बिहारच्या राजकारणात नवीन समीकरणांची चर्चा सुरू झालीय.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

भाजपबरोबर आरजेडीला धक्का (Prashant Kishor Win)

बांकीपूर विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. भाजपचे राष्ट्रीय नितीन नबीन यांना राज्यसभेवर घेतल्याने ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर तिरंगी लढत झाली. त्यात प्रशांत किशोर यांनी मतमोजणीच्या पहिल्याफेरीपासून आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत तशीच ठेवली. प्रशांत किशोर यांनी 63 हजार 203 मते घेत विजयी झाले. त्यांनी भाजपचा उमेदवार निरज कुमार यांचा 18953 मतांनी पराभव केला. निरज यांना 44 हजार 250 मते मिळाली होती. तर तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) रेखा कुमारी या तिसऱ्या स्थानी राहिल्या. त्यांना 14 हजार 85 मते मिळाली.

भाजपला काय नडलं ?

बांकीपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने पहिल्यांदा अभिषेक कुमार उर्फ बंटी यांना उमेदवीर जाहीर केली होती. पण अवघ्या 24 तासांत अभिषेक यांनी ‘कौटुंबिक कारणांमुळे’ उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर केले. परंतु अभिषेक कुमार यांची आई वडिल चारा घोटाळ्यात दोषी आढळलेले आहेत. त्यामुळे भाजपवर टीका होऊ शकते म्हणून त्यांना उमेदवारी माघार घेण्यास सांगितले. तसेच अभिषेक कुमार यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर भाजपने 32 वर्षीय नीरज कुमार सिन्हा यांना उमेदवार घोषित केली.तसेच दिल्लीतील आंदोलनाचा फटकाही भाजपला येथे बसला. सम्राट चौधरी हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिली निवडणूक होती. त्यात राष्ट्रीय अध्यक्षांबरोबर सम्राट चौधरीही अपयशी ठरले आहेत.