Ajit Pawar : अजितदादांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याची मागणी; विक्रम काकडे यांनी घेतली अमित शाहांची भेट

0
Ajit Pawar : अजितदादांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याची मागणी; विक्रम काकडे यांनी घेतली अमित शाहांची भेट
Ajit Pawar : अजितदादांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याची मागणी; विक्रम काकडे यांनी घेतली अमित शाहांची भेट

नगर : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना मरणोत्तर पद्यविभूषण पुरस्कार द्यावा,अशी मागणी(Posthumous Padma Vibhushan Award) राष्ट्रवादी पक्षाने केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काकडे (MLA Vikram Kakade) यांनी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची विनंती केल्याची माहिती त्यांनी दिली. नुकतीच पक्षाच्या सर्व आमदारानी अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याबाबत सह्यांचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं आणि केंद्राकडे शिफारस करण्याबाबत विनंती केली होती.

नक्की वाचा : WhatsApp अकाऊंट होणार बंद, ‘या’ चुका तुम्हाला महागात पडणार!

विक्रम काकडे यांनी घेतली अमित शाह यांची भेट (Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतली. त्यांनी दादांना मरणोत्तर पद्यविभूषण पुरस्कार देण्याची मागणी केली. त्यांनी या भेटीत याविषयीचे निवेदन शहांना दिले. राजकीय, सावर्जनिक जीवनातील दादांच्या योगदानाचा गौरव व्हावा यासाठी त्यांना देशातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर जाहीर करावा, अशी विनंती त्यांनी केली. अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात अनेक वर्षे विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी अनेक वर्षे राज्याचे अर्थ खाते सांभाळले. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचाही विक्रम केला आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळ विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता.

अवश्य वाचा : अवघ्या २० रुपयात केला विवाह! इंदोरीकर महाराजांनी सांगितला स्वतःच्या लग्नाचा मजेशीर किस्सा

पद्यविभूषण नेमका कोणाला दिला जातो? (Ajit Pawar)

पद्यविभूषण हा भारताचा दुसर्‍या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा, सामाजिक कार्य, उद्योग, वैद्यक, क्रीडा अशा प्रकारात केंद्र सरकारकडून असामान्य आणि अतुलनीय योगदानासाठी हा सन्मान दिल्या जातो. १९५४ मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली होती. भारताच्या राष्ट्रपतींकडून हा पुरस्कार देण्यात येतो. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. त्यानंतर पद्यविभूषण पुरस्कार आहे. भारतीय नागरिकच नाही तर काही परदेशी नागरिकांचाही सन्मान करण्यात आलेला आहे.

काही व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार कुणाला द्यायचा याचा निर्णय केंद्र सरकारची पद्य पुरस्कार निवड समिती ठरवते. पद्य पुरस्कार समिती शिफारशींचा विचार करून अंतिम मंजुरीनंतर राष्ट्रपतींकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी केंद्र सरकारची मंत्रालये, राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार, विविध संस्था तसेच सर्वसामान्य नागरिक सुद्धा नामांकन सुचवू शकतात.