Whatsapp Ban : WhatsApp अकाऊंट होणार बंद, ‘या’ चुका तुम्हाला महागात पडणार!

0
Whatsapp Ban : WhatsApp अकाऊंट होणार बंद, 'या' चुका तुम्हाला महागात पडणार!
Whatsapp Ban : WhatsApp अकाऊंट होणार बंद, 'या' चुका तुम्हाला महागात पडणार!

नगर :  जगभरात सगळ्यांचे आवडते मेसेजिंग अँप म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp Ban) हे मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. मेसेजिंग, व्हिडीओ कॉलिंग, डॉक्यूमेंट शेअरिंग तसेच अन्य महत्त्वाच्या कामांसाठी आज व्हॉट्सअ‍ॅप हे एक विश्वासाचे माध्यम बनले आहे. व्हॉट्सअ‍ॅप नसेल तर काय असा प्रश्न उभा राहिला आहे.आजकाल अनेकजण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असले तरीही आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरताना काही चुका (Mistakes while using WhatsApp) केल्या तर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते तात्पुरते बंद होऊ शकते किंवा ते थेट बंद केले जाऊ शकते. आता या चुका कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या…

नक्की वाचा : अवघ्या २० रुपयात केला विवाह! इंदोरीकर महाराजांनी सांगितला स्वतःच्या लग्नाचा मजेशीर किस्सा

कोणत्या आहेत ‘त्या’ चुका  (Whatsapp Ban)

१. थर्ड पार्टी अ‍ॅप वापरणं धोक्याचं

अनेक युजर्स व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी GB WhatsApp, व्हॉट्सअ‍ॅप प्लस अशा थर्ड पार्टी अ‍ॅपचा वापर करतात. हे सगळे व्हॉट्सअ‍ॅपचे अधिकृत व्हर्जन नाही. मेटा कंपनीकडून असे कोणतेही थर्ड पार्टी अ‍ॅप वापरण्यास परवानगी नाही. त्यामुळे तुम्ही हे थर्ड पार्टी अ‍ॅप वापरत असाल तर तुमचे खाते बंद केले जाऊ शकते. ही बंदी तात्पुरती किंवा कायमस्वरुपी असू शकते. व्हॉट्सअ‍ॅपचे अधिकृत अ‍ॅप हे गुगल प्ले स्टोअर किंवा Apple App Store वरूनच डाऊनलोड करावे, असे सांगितले जाते.

अवश्य वाचा : पंकजा अन् धनंजय मुंडेंनी गलिच्छ राजकारण केलंय’,करुणा शर्मांची टीका

२. अनेक लोकांना मेसेज पाठवणे  

जर तुम्ही कमी वेळेत भरपूर साऱ्या लोकांना बल्कमध्ये मेसेज पाठवत असाल तर व्हॉट्सअ‍ॅप त्याला स्पॅम प्रॅक्टिस गृहित धरते. यामुळे तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद होऊ शकते.

३. खोटी बातमी शेअर करणे   (Whatsapp Ban)

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक मेसेज रोज फॉरवर्ड केले जातात. या मेसेजमध्ये काही बातम्यांचा समावेश असतो. यातील काही बातम्या या खोट्या असतात. अशा खोट्या बातम्या तुम्ही खऱ्या समजून फॉरवर्ड करत असाल तर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद केले जाऊ शकते. चुकीची माहिती पसरवल्यामुळे तुमच्यावर ही कारवाई होऊ शकते. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह कंटेंट शेअर करत असाल तरी देखील तुमचे खाते बंद केले जाऊ शकते. कायदेशीर दृष्ट्या बंदी असलेली माहिती शेअर केल्यावरही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद केले जाऊ शकते.