Student protest march by Chhatra Bharati in Akola : अकोल्यात छात्रभारतीचा विद्यार्थी मोर्चा; शिक्षक भारतीचाही जाहीर पाठिंबा

Student protest march by Chhatra Bharati in Akola

0
Student protest march by Chhatra Bharati in Akola
Student protest march by Chhatra Bharati in Akola

मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Student protest march by Chhatra Bharati in Akola : अकोले : कनिष्ठ महाविद्यालयांतील विविध शैक्षणिक निर्णयांविरोधात छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली अकोले (Student protest march by Chhatra Bharati in Akola) येथे विद्यार्थ्यांचा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या (Education Minister) विरोधात घोषणाबाजी करत तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.

निर्णयांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचा दावा

विद्यार्थ्यांनी ४५ मिनिटांची तासिका ४० मिनिटांवर आणण्याचा निर्णय, विज्ञान शाखेतील प्रात्यक्षिकांच्या बॅच रचनेतील बदल, कला शाखेतील वैकल्पिक विषयांच्या तुकड्या कमी करणे तसेच शिक्षण क्षेत्रातील इतर निर्णयांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा दावा केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास राज्यभर जिल्हानिहाय आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विद्यार्थी व शिक्षकांच्या हिताचे निर्णय घेण्याची मागणी (Student protest march by Chhatra Bharati in Akola)

दरम्यान, या आंदोलनाला शिक्षक भारती संघटनेने जाहीर पाठिंबा दिला. प्रवेश प्रक्रिया लांबल्यामुळे अध्यापनाचे दिवस कमी होत असून, बारावीची परीक्षा जानेवारीत होत असल्याने अभ्यासासाठी उपलब्ध कालावधी घटला आहे. त्यातच तासिका कमी केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे शिक्षक भारतीने नमूद केले. तसेच संचमान्यता प्रक्रियेतील निकषांचा पुनर्विचार करून विद्यार्थी व शिक्षकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी संघटनेने केली.

आंदोलनाचे नेतृत्व छात्रभारतीचे राज्याध्यक्ष अनिकेत घुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी विशाल शिंदे, सुदर्शन रुपवते, अवधूत नवले, उदय पवार, ऊर्जा गायकवाड, मयूर आवारी, प्रतीक्षा शिंदे, प्रज्वल रुपवते, कैफ तांबोळी, सोहम घुले, अभिषेक वैराळ यांच्यासह विद्यार्थी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.