Balrangbhumi Parishad | अहिल्यानगरला ‘इतिहास महाराष्ट्राचा’ महाअंतिम फेरी; राज्यभरातील ४५० बालकलाकारांचा सहभाग

0
Balrangbhumi Parishad
Balrangbhumi Parishad

Balrangbhumi Parishad | नगर : बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती, मुंबई ( Balrangbhumi Parishad ) आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ इतिहासातील एका थोर विभूतीस दरवर्षी हा महोत्सव समर्पित केला जातो. यंदाच्या वर्षी हा महोत्सव ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ यांना समर्पित करण्यात आला आहे. राज्यभरातील २२ केंद्रांवर २३०० बाल कलावंतांनी यात आपली कला सादर केली. प्राथमिक फेरी केंद्रात झालेल्या या महोत्सवाची महाअंतिम फेरी घेण्याचा बहुमान बालरंगभूमी परिषद अहिल्यानगर शाखेला मिळाला आहे. ही महाअंतिम फेरी रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत माऊली सभागृह येथे संपन्न होणार आहे. यात महाराष्ट्रभरातून ४५० बाल कलावंत सहभागी होणार आहेत. अशी माहिती बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती, मुंबई अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के-सामंत यांनी दिली आहे.

हे वाचा – पुणेकरांच्या वाहनावर आता ‘MH 12 ZZ’ कायम राहणार! गडकरींची भेट घेत मुरलीधर मोहोळ यांनी काढला तोडगा

महोत्सवात बालकलाकारांचा सहभाग ( Balrangbhumi Parishad )

नाट्य, नृत्य, संगीत आदी कलांच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरुषांची व थोर विभूतींची सखोल माहिती बालप्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी आणि बालकांना त्यातून प्रेरणा मिळावी, या प्रमुख उद्देशापोटी हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. या महोत्सवात बालकलाकार नाट्य, नृत्य, गायन आणि वादनाच्या सादरीकरणातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे प्रेरणादायी जीवनकार्य मांडत आहेत. असे अभिनेत्री तथा अध्यक्ष ॲड.निलम शिर्के-सामंत सांगितले.

या स्पर्धा महोत्सवाचे स्वरूप तीन गटांत असून यामध्ये एकल लहान गट, मोठा गट आणि सांघिक गट अशा विविध प्रकारांत (एकपात्री, नाट्यछटा, स्वगत, गाणी व नृत्य) बालकलाकार रंगमंचावर आपली कला सादर करणार आहे.

नक्की वाचा : जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल

केंद्रांवर प्राथमिक फेऱ्या पार ( Balrangbhumi Parishad )

संपूर्ण महाराष्ट्रात बृहन्मुंबई, अहिल्यानगर, जळगाव, नंदुरबार, जालना, नवी मुंबई, सोलापूर, पुणे, बीड, जळगाव, कोल्हापूर, लातूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, धुळे, कल्याण, ठाणे, मंगळवेढा, सोलापूर, सातारा, इचलकरंजी आदी केंद्रांवर प्राथमिक फेऱ्या पार पडल्या. यातून निवड झालेले ४५० हून अधिक बालकलाकार आता अहिल्यानगरमधील महाअंतिम फेरीत आमनेसामने असतील. या अंतिम फेरीचे परीक्षण ख्यातनाम अभिनेते व तज्ज्ञ परीक्षक संजय हळदीकर (कोल्हापूर), प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे (मुंबई) आणि अभिनेते दिगंबर नाईक पाहणार आहेत, अशी माहिती महोत्सव प्रमुख दीपाली शेळके यांनी दिली.

या महाअंतिम सोहळ्याला नाट्य व लोककला क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून अंतिम फेरीत पोहचलेल्या बालकलाकारांच्या गुणवत्तापूर्ण सादरीकरणाचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी नगरवासीयांना मिळणार आहे. या महोत्सवाला नगरवासियांनी व बाल प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती, मुंबईचे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कार्यकारी मंडळ सदस्य अनंत जोशी, देवीप्रसाद सोहोनी व अहिल्यानगर जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रसाद भणगे, शैलेश देशमुख यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here