MLA Vikram Pachpute : बनावट ‘ॲनालॉग चीज’ व पनीरवर अखेर राज्य सरकारची बंदी!आमदार विक्रम पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश

MLA Vikram Pachpute : बनावट ‘ॲनालॉग चीज’ व पनीरवर अखेर राज्य सरकारची बंदी!आमदार विक्रम पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश;

0
MLA Vikram Pachpute : बनावट ‘ॲनालॉग चीज’ व पनीरवर अखेर राज्य सरकारची बंदी!आमदार विक्रम पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश;
MLA Vikram Pachpute : बनावट ‘ॲनालॉग चीज’ व पनीरवर अखेर राज्य सरकारची बंदी!आमदार विक्रम पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश;

MLA Vikram Pachpute : श्रीगोंदा : राज्यामध्ये सर्रास विकल्या जाणाऱ्या बनावट (ॲनालॉग) चीज आणि आर्टिफिशिअल पनीरच्या (Analogue Paneer) विक्री आणि वापरावर अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) एका वर्षासाठी पूर्णतः बंदी घातली आहे. आमदार विक्रम पाचपुते (MLA Vikram Pachpute) यांनी विधिमंडळात उठवलेल्या आवाजाची दखल घेत प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला असून, यामुळे राज्यातील सर्वसामान्य ग्राहक, लहान मुले आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तत्काळ बंदी घालण्याची केली होती मागणी

आमदार विक्रम पाचपुते यांनी मार्च २०२५ मध्ये सभागृहात बनावट पनीर आणि ॲनालॉग चीजच्या मुद्द्यावर तीव्र आवाज उठवला होता. राज्यामध्ये विकल्या जाणाऱ्या पनीरपैकी जवळपास ७० टक्के पनीर बनावट असून, हे नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचे सांगत त्यांनी यावर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली होती.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आराेग्यासाठी घातक असल्याचे स्पष्ट (MLA Vikram Pachpute)

आमदार पाचपुते यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अधिकृत अध्यादेश जारी केला आहे. गेल्या वर्षभरात एफडीएने घेतलेल्या नमुन्यांपैकी अनेक नमुने अपात्र ठरले असून ते मानवी वापरासाठी अत्यंत घातक असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ॲनालॉग चीज आणि बनावट पनीरच्या विक्री आणि वापरावर एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे.

निर्णयाबद्दल आमदार विक्रम पाचपुते यांनी एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, राज्यमंत्री योगेश कदम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले

“हा निर्णय राज्यातील प्रत्येक ग्राहकाचे आरोग्य सुरक्षित करणारा आहे. आम्ही लहान मुलांना अन्नाच्या नावाखाली तेलाचे गोळे खायला देत होतो. मात्र आता या निर्णयामुळे शुद्ध दुग्धजन्य पदार्थांना चालना मिळेल आणि आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा थेट फायदा होईल.”

  • विक्रम पाचपुते आमदार