नगर : यश राज फिल्म्स (YRF) ही भारतीय चित्रपट कंपनी प्रथमच हॉरर (Horror Movie) या शैलीत पाऊल ठेवत आहे. दिग्दर्शक अभय पन्नू यांच्या आगामी थिएटरिकल चित्रपटाद्वारे हा नवा प्रवास सुरू होत आहे. समीक्षकांची प्रशंसा मिळालेल्या रॉकेट बॉयज या सीरीजसाठी ओळखले जाणारे अभय पन्नू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासोबतच पटकथाही लिहिली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण यावर्षाच्या अखेरीस सुरू होणार आहे. YRF च्या पहिल्या हॉरर चित्रपटासाठी वरुण धवनची (Varun Dhawan Horror Film) मुख्य अभिनेता म्हणून निवड करण्यात आली आहे.
नक्की वाचा : शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित
YRF च्या पहिल्या हॉरर चित्रपटासाठी वरुण धवनची निवड (Varun Dhawan Horror Film)
समोर आलेल्या माहितीनुसार, यश राज फिल्म्स प्रथमच हॉरर शैलीत प्रवेश करत आहे. अभय पन्नू दिग्दर्शित, अक्षय विधानी यांच्या धोरणात्मक पुढाकारातून साकार होणाऱ्या या चित्रपटात वरुण धवन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. YRF ने आजवर जवळपास सर्वच प्रकारच्या चित्रपटांची निर्मिती केली आहे, मात्र हॉरर हा एकमेव प्रकार बाकी होता. २०२७ मध्ये हा प्रतिष्ठित बॅनर अखेर हॉरर विश्वात पदार्पण करणार आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगरमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार; ५२३ भावांनीच लाटले पैसे
२०२७ ला येणार चित्रपट (Varun Dhawan Horror Film)

रॉकेट बॉईजनंतर अभय पन्नू यांचा हा पहिलाच थिएटरिकल चित्रपट असेल. तसेच, नव्या पिढीतील दिग्दर्शकांना संधी देण्याच्या YRF च्या भूमिकेलाही हा चित्रपट अधिक बळकटी देतो. सैयाराच्या अभूतपूर्व यशानंतर आदित्य चोप्रा यांच्या मार्गदर्शनाखाली YRF ने मोहित सूरी, समीर सक्सेना आणि आता अभय पन्नू यांसारख्या वेगळ्या दिग्दर्शकीय आवाजांवर विश्वास दाखवला आहे. सुई धागा नंतर वरुण धवनचा यश राज फिल्म्स सोबतचा हा दुसरा चित्रपट असून, YRF च्या पहिल्याच थिएटरिकल हॉरर चित्रपटाचे नेतृत्व तो करणार आहे. २०२७ मध्ये हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.



