Accident : श्रीगोंदा येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; कारचालक घटनास्थळावरुन पसार  

तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू

0
Accident : श्रीगोंदा येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; कारचालक घटनास्थळावरुन पसार  
Accident : श्रीगोंदा येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; कारचालक घटनास्थळावरुन पसार  

Accident : श्रीगोंदा : काष्टी रस्त्यावरील लिंपणगाव शिवारात आज (ता. ११) सायंकाळी कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार (Death) झाला. अपघातात (Accident) मृत्यू पावलेल्या तरुणाची अद्याप ओळख पटली नसून, अपघातानंतर कारचालक (Car Driver) घटनास्थळावरुन पसार झाला. ओव्हरटेक करुन पुढे जात असताना हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

नक्की वाचा : धीरज परदेशी हत्याप्रकरणातील आरोपींचे घर पाडण्यासंबंधी न्यायालयाचा मोठा आदेश

दुचाकीस्वारास समोरून धडक

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंद्याहून काष्टीच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या चारचाकी वाहनाने श्रीगोंद्याच्या दिशेने निघालेल्या दुचाकीस्वारास समोरून जोराची धडक दिली.या धडकेत दुचाकी जवळपास पन्नास फूट बाजूला फेकली गेली तर दुचाकीस्वार उडून रस्त्यावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू (Accident)

धडक झाल्यानंतर कारच्या तीन पलट्या होऊन कार बाजूच्या खड्ड्यात जाऊन पडली. यानंतर वाहनचालकाने गाडीतून बाहेर येत तिथून पळ काढला. दरम्यान अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाची ओळख पटविण्याचे काम श्रीगोंदा पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.