DC : चौंडी, शिर्डी, शनिशिंगणापूरच्या विकासकामांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

0
DC : चौंडी, शिर्डी, शनिशिंगणापूरच्या विकासकामांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
DC : चौंडी, शिर्डी, शनिशिंगणापूरच्या विकासकामांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

DC : नगर : चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन तसेच नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी व शनिशिंगणापूर येथे प्रस्तावित विविध विकासकामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत चौंडी, शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथील विविध विकासकामांचे नियोजन, प्रस्तावित कामांची सद्यस्थिती आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

नक्की वाचा : धीरज परदेशी हत्याप्रकरणातील आरोपींचे घर पाडण्यासंबंधी न्यायालयाचा मोठा आदेश

विकासकामांचा आढावा

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित विविध कामांचा तसेच प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित विकासकामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. स्मृतीस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक नियोजन करून कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

हे पहा – कंटेनरच्या धडकेने घडला भीषण अपघात; उद्योजकासह अभियंत्याचा मृत्यू

कामे जलदगतीने पूर्ण करा (DC)

पुतळा उभारणीसाठी समिती स्थापन करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, प्रस्तावित आराखड्यासाठी आवश्यक जागा भूसंपादित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या. नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. भाविकांची वाहतूक, वाहनतळ, रस्ते आणि इतर नागरी सुविधांचे योग्य नियोजन करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.