Local Crime Branch : जेऊर बायजाबाई येथे अवैध मावा निर्मितीच्या अड्ड्यावर छापा; १ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

मावा तयार केला जात असल्याचे आढळले

0
Local Crime Branch : जेऊर बायजाबाई येथे अवैध मावा निर्मितीच्या अड्ड्यावर छापा; १ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Local Crime Branch : जेऊर बायजाबाई येथे अवैध मावा निर्मितीच्या अड्ड्यावर छापा; १ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Local Crime Branch : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई (Jeur Baijabai) परिसरात घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये सुगंधित तंबाखू (Scented tobacco) व सुपारीचे मिश्रण करून अवैधरीत्या मावा तयार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने बुधवारी (ता.१२) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. बबल बापू ससे (वय २३, रा. आठरे वस्ती, ससेवाडी) याला ताब्यात घेण्यात आले.

नक्की वाचा : ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मावा तयार केला जात असल्याचे आढळले

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी यासाठी विशेष पथक तयार केले होते. हे पथक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायांची माहिती घेत असताना जेऊर बायजाबाई येथील ससेवाडी रोड परिसरात मावा तयार केला जात असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी सुगंधित तंबाखू आणि सुपारी एकत्र करून मावा तयार केला जात असल्याचे आढळून आले.

या कारवाईत बबल बापू ससे (वय २३, रा. आठरे वस्ती, ससेवाडी) याला ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचा १५ किलो तयार मावा, ६३ हजार रुपये किमतीचा ९० किलो सुपारीचा चुरा, १५ हजार रुपये किमतीची १५ किलो सुगंधित तंबाखू आणि ३५ हजार रुपये किमतीची १७ हजार ५०० किलो सुगंधित तंबाखू, असा एकूण १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Local Crime Branch)

चौकशीत हा मुद्देमाल शशिकांत रामदास मगर (रा. मगर वस्ती, ससेवाडी रोड, जेऊर बायजाबाई) याच्या मालकीचा असल्याचे तसेच जितू मालपाणी (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही, रा. छत्रपती संभाजीनगर) याने तंबाखूचा माल पुरविल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघेही सध्या पसार आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि त्यांच्या पथकातील विजय ठोंबरे, अतुल लोटके, संदिप पवार, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, सागर ससाणे, योगेश कर्डीले, दिपक जाधव व अमृत आढाव यांच्या पथकाने केली.