Leopard Captured : रवंदे शिवारात बिबट्या जेरबंद, ग्रामस्थांची पाहण्यासाठी गर्दी

Leopard Captured : रवंदे शिवारात बिबट्या जेरबंद, ग्रामस्थांची पाहण्यासाठी गर्दी

0
Leopard Captured : रवंदे शिवारात बिबट्या जेरबंद, ग्रामस्थांची पाहण्यासाठी गर्दी
Leopard Captured : रवंदे शिवारात बिबट्या जेरबंद, ग्रामस्थांची पाहण्यासाठी गर्दी

Leopard Captured : कोपरगाव : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रवंदे शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून तीन बिबट्यांचा (Leopard) वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी एकाच वेळी तीन बिबटे पाहिल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांना दिवसा तसेच रात्री शेतातील कामे करताना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत होते. त्यामुळे वनविभागाने (Forest Department) तातडीने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.

तत्काळ पोलीस आणि वनविभागाला दिली माहिती

ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत वनविभागाने सुमारे आठ दिवसांपूर्वी रवंदे शिवारातील एका शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. दरम्यान आज रविवार दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी शेतकरी दीपक भाऊसाहेब कदम यांच्या निदर्शनास पिंजऱ्यात बिबट्या अडकलेला (Leopard Captured) दिसला. त्यांनी तत्काळ पोलीस आणि वनविभागाला याची माहिती दिली.

Leopard Captured : रवंदे शिवारात बिबट्या जेरबंद, ग्रामस्थांची पाहण्यासाठी गर्दी
Leopard Captured : रवंदे शिवारात बिबट्या जेरबंद, ग्रामस्थांची पाहण्यासाठी गर्दी

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी (Leopard Captured)

बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. वनविभागाकडून बिबट्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र, परिसरात आणखी बिबट्यांचा वावर असल्याने धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी बिबट्या पकडण्यात आला, त्याच ठिकाणी पुन्हा पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.

एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने रवंदे परिसरातील ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी उर्वरित बिबट्यांचा बंदोबस्त होईपर्यंत शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.