Ex-serviceman dies due to stray animals : मोकाट जनावरांमुळे पुन्हा एक बळी; माजी सैनिक किशोर शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Ex-serviceman dies due to stray animals : मोकाट जनावरांमुळे पुन्हा एक बळी; माजी सैनिक किशोर शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

0
Ex-serviceman dies due to stray animals : मोकाट जनावरांमुळे पुन्हा एक बळी; माजी सैनिक किशोर शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू
Ex-serviceman dies due to stray animals : मोकाट जनावरांमुळे पुन्हा एक बळी; माजी सैनिक किशोर शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Ex-serviceman dies due to stray animals : कोपरगाव : कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा (Stray animal) प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच, विकास डुंबरे यांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसांतच मोकाट जनावरांच्या धडकेत आणखी एका व्यक्तीचा बळी गेला आहे. (Ex-serviceman dies due to stray animals) भारतीय सैन्यात १८ वर्षे सेवा बजावलेले माजी सैनिक (Ex-serviceman) किशोर मच्छिंद्र शिंदे (वय ४४, रा. मुर्शतपूर) यांचा शनिवार, १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता पुणे येथील न्यू कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऐन स्वातंत्र्यदिनी माजी सैनिकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त

यापूर्वी काही दिवसांपूर्वी विकास डुंबरे यांचा मोकाट जनावरामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही मोकाट जनावरांचा प्रश्न कायम राहिल्याने आता पुन्हा एका व्यक्तीचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या महिन्याभरात मोकाट जनावरांमुळे मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मोकाट जनावराची धडकेने डोक्याला गंभीर दुखापत

मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी रात्री नागरे पेट्रोल पंप, धारणगाव रोड परिसरात किशोर शिंदे हे घरी जात असताना त्यांच्या वाहनाला मोकाट जनावराची धडक झाली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील न्यू कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

किशोर शिंदे यांनी भारतीय सैन्यात तब्बल १८ वर्षे सेवा बजावली होती. सैन्यसेवेनंतर ते अडत व्यापारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मोकाट जनावरांमुळे यापूर्वीही शहरात अनेक अपघात झाले असून नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, वारंवार अपघात आणि आता सलग दोन मृत्यू होऊनही हा प्रश्न कायम असल्याने जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असताना प्रशासन आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार, असा सवालही उपस्थित होत आहे. मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांकडून केली जात आहे.

विकास डुंबरे यांच्यानंतर आता माजी सैनिक किशोर शिंदे यांचा गेलेला जीव ही केवळ अपघाताची घटना नसून कोपरगावातील मोकाट जनावरांच्या गंभीर प्रश्नाची पुन्हा एकदा जाणीव करून देणारी घटना ठरली आहे.