MLA Amol Khatal : आमदार अमोल खताळ यांनी पत्नी सह निझर्णेश्वर मंदिरात केली पूजा

MLA Amol Khatal : आमदार अमोल खताळ यांनी पत्नी सह निझर्णेश्वर मंदिरात केली पूजा

0
MLA Amol Khatal : आमदार अमोल खताळ यांनी पत्नी सह निझर्णेश्वर मंदिरात केली पूजा
MLA Amol Khatal : आमदार अमोल खताळ यांनी पत्नी सह निझर्णेश्वर मंदिरात केली पूजा

MLA Amol Khatal : संगमनेर : कोकणगाव येथील श्री निझर्णेश्वर मंदिर (Shri Nizharneshwar Temple) परिसर वनविभागाच्या (Forest Department) हद्दीत येत असल्याने मंदिराच्या विकासकामांमध्ये विविध अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, मंदिर परिसरासाठी वनविभागाची जागा उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून वनजमिनीचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यात येईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांनी व्यक्त केला.

शिवभक्त आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित

तालुक्यातील कोकणगाव येथील श्री निझर्णेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारनिमित्त आमदार खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते अभिषेक, पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी
सचिन शिंदे, पप्पू गाढे, सुमित काशिद, डॉ. संदीप जोंधळे, महेश जोंधळे, भारत जोंधळे, विजय वामन, आदित्य पवार, रमेश शिंगोटे, प्रज्वल जोंधळे, अमोल जोंधळे, रणजीत जाधव, देवस्थान ट्रस्टचे बबन पवार, दिलीप जोंधळे, गंगाधर वायकर, बाळासाहेब जोंधळे, नंदू पानसरे यांच्यासह देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी, ग्रामस्थ, शिवभक्त आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आमदार खताळ म्हणाले, (MLA Amol Khatal)

“मायबाप जनतेने मला या तालुक्याची सेवा करण्याची संधी दिल्यापासून निझर्णेश्वर मंदिरासह परिसराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मंदिर परिसर वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे विकासकामांना काही कायदेशीर अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित मंत्री आणि शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.”

MLA Amol Khatal : आमदार अमोल खताळ यांनी पत्नी सह निझर्णेश्वर मंदिरात केली पूजा
MLA Amol Khatal : आमदार अमोल खताळ यांनी पत्नी सह निझर्णेश्वर मंदिरात केली पूजा


निझर्णेश्वर मंदिराची वास्तू जुनी झाल्यामुळे भाविक, ग्रामस्थ आणि देवस्थानशी संबंधित सर्व घटकांची सहमती घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिराच्या विकासासाठी भाविकांचे योगदान, ग्रामस्थांचे सहकार्य आणि शासनाची मदत यांचा समन्वय साधून काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

पुढील वर्षी श्रावण महिन्यापर्यंत नवीन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण होऊन शिवभक्तांना नव्या मंदिरा मध्ये दर्शनाचा लाभ मिळेल. विकास कामांना गती देतानाच भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येणार आहे. निझर्णेश्वर मंदिर हे तालुक्या तील श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र असून, या धार्मिक स्थळाचा विकास करताना परिसराचे सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व जपण्याचा प्रयत्न केला जाईल.

श्री अमोल खताळ,
आमदार संगमनेर विधानसभा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here