Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये ‘अहिल्या सरस्वती महोत्सवा’चे आयोजन

0
Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये 'अहिल्या सरस्वती महोत्सवा'चे आयोजन
Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये 'अहिल्या सरस्वती महोत्सवा'चे आयोजन

नगर :  अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar News) सरस्वती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल (Saraswati Superspeaciality Hospital) प्रस्तुत ‘अहिल्या सरस्वती महोत्सवाचे (Ahilya Saraswati Mahotsav) आयोजन करण्यात आले आहे. हे या महोत्सवाचे ३ रे वर्ष आहे. 22 ते 30 ऑगस्ट 2026 दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला टायटल स्पॉन्सर म्हणून महावीर ग्रुप तसेच मीडिया पार्टनर म्हणून आय लव्ह नगरचे सहकार्य लाभले आहे.

नक्की वाचा : लाडक्या बहि‍णींसाठी गुडन्यूज;खात्यात पैसे येण्यास सुरूवात

22 ते 28 ऑगस्ट दरम्यान महोत्सवाचे आयोजन (Ahilyanagar News)

सरस्वती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात 22 ऑगस्टला – मानसिक तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक जीवनशैलीवर विशेष ऑनलाइन सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच 19 ते 28 ऑगस्ट दरम्यान – “माझ्या आयुष्यातील अहिल्या” नावाची Online Video Contest घेण्यात येत आहे. यामध्ये आपल्या आयुष्यातील प्रेरणादायी स्त्रीची गोष्ट सांगणारा 1 मिनिटाचा व्हिडिओ स्पर्धकांना बनवायचा आहे. त्याचबरोबर 23 ऑगस्टला  – महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारी अहिल्याशक्ती भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३ वाजता ही रॅली निघणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिलांना या रॅलीत सहभागी होता येईल.

अवश्य वाचा : मराठी नाटकांचा रंगभूमीवर जलवा! ‘जर तर ची गोष्ट’ चा ४०० वा तर ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी’चा रंगणार ५० वा प्रयोग

30 ऑगस्टला ‘अहिल्या सरस्वती महोत्सव’ (Ahilyanagar News)

24 ते 28 ऑगस्ट दरम्यान या महोत्सवात  Saraswati Super Speciality Hospital कडून विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्याबद्दल मार्गदर्शन ही केलं जाईल. तसेच  25 ते 29 ऑगस्ट –  दरम्यान ऑडिशनमध्ये निवड झालेल्या स्पर्धकांसाठी विशेष Grooming Sessions याठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये रॅम्प वॉक, स्टेज कॉन्फिडन्स, व्यक्तिमत्त्व विकास यावर मार्गदर्शन केलं जाईल. 30 ऑगस्टला ‘अहिल्या सरस्वती महोत्सव’ हा मुख्य कार्यक्रम पार पडेल. यामध्ये निवड झालेल्या सहभागींचा विशेष Runway आणि महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम पार पडेल.  ‘अहिल्या सरस्वती महोत्सवात पार पडणाऱ्या या वेगवेगळ्या कार्यक्रमात जास्तीत जास्त नगरकरांनी सहभागी व्हावे, असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.