Tushar Pote : भाजपच्या भटके-विमुक्त प्रकोष्ठाच्या राज्य समितीवर तुषार पोटे

पक्षाच्या विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळताना अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभर पक्षविस्तारासाठी सातत्याने काम

0
Tushar Pote : भाजपच्या भटके-विमुक्त प्रकोष्ठाच्या राज्य समितीवर तुषार पोटे
Tushar Pote : भाजपच्या भटके-विमुक्त प्रकोष्ठाच्या राज्य समितीवर तुषार पोटे

Tushar Pote : नगर : भारतीय जनता पार्टीच्या (BJP) भटके-विमुक्त प्रकोष्ठाच्या राज्य समितीवर सहसंयोजकपदी अहिल्यानगरचे तुषार पोटे (Tushar Pote) यांची निवड करण्यात आली आहे. राज्य समितीचे अध्यक्ष नरेंद्र पवार (Narendra Pawar) यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पोटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नक्की वाचा : आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला रंगत;  सेंट मायकल, आर्मी व प्रवरा स्कूलचा दमदार विजय

प्रदीर्घ संघटनात्मक कार्याची दखल

तुषार पोटे गेल्या २५ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. पक्षाच्या विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभर पक्षविस्तारासाठी सातत्याने काम केले आहे. २००९ मध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकारिणी चिटणीसपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यानंतर २०१३ मध्ये युवा मोर्चाचे सरचिटणीस, २०१६ मध्ये युवा मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष, तर २०२० मध्ये भाजप शहर जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर २०२३ मध्ये भटके-विमुक्त मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. २०२६ मध्ये प्रदेश सरचिटणीस तथा सहसंयोजक म्हणून त्यांनी भटके-विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम केले. आता राज्य समितीवर सहसंयोजक म्हणून झालेली निवड ही त्यांच्या प्रदीर्घ संघटनात्मक कार्याची दखल मानली जात आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

संघटनात्मक पातळीवर काम (Tushar Pote)

लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका आणि विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी पोटे यांनी सातत्याने प्रयत्न केले. भटके-विमुक्त समाजातील कार्यकर्ते व नागरिकांशी संपर्क वाढवून त्यांना पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठीही त्यांनी संघटनात्मक पातळीवर काम केले आहे. पोटे यांच्या निवडीबद्दल विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगर उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले.राज्य समितीवर मिळालेल्या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून भटके-विमुक्त समाजातील प्रश्नांना पक्षाच्या व्यासपीठावर प्रभावीपणे मांडण्यासोबतच संघटनात्मक विस्ताराला अधिक गती देण्याचा निर्धार तुषार पोटे यांच्या निवडीमुळे व्यक्त होत आहे.