Three goats killed in leopard attack : डोंगरगण परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; हल्ल्यात तीन शेळ्या ठार

Three goats killed in leopard attack : डोंगरगण परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; हल्ल्यात तीन शेळ्या ठार

0
Three goats killed in leopard attack : डोंगरगण परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; हल्ल्यात तीन शेळ्या ठार
Three goats killed in leopard attack : डोंगरगण परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; हल्ल्यात तीन शेळ्या ठार

Three goats killed in leopard attack : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील डोंगरगण परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार (Three goats killed in leopard attack) झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकाश नारायण झरेकर यांच्या वस्तीवर पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने (Leopard) शेळ्यांवर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे (Forest Department) अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून घटनेची माहिती घेतली.

Three goats killed in leopard attack : डोंगरगण परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; हल्ल्यात तीन शेळ्या ठार
Three goats killed in leopard attack : डोंगरगण परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; हल्ल्यात तीन शेळ्या ठार

ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित

डोंगरगण ग्रामपंचायतचे उपसरपंच संतोष पटारे, माजी सरपंच कैलास पटारे, वनरक्षक श्रीहरी आठरे, ग्रामस्थ शंकर चांदणे, शेतकरी प्रकाश झरेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

परिसरात बिबट्यासह वन्यप्राण्यांचा वावर (Three goats killed in leopard attack)

डोंगरगण-मांजरसुंबा परिसर डोंगररांगांनी वेढलेला असल्याने येथे बिबट्यासह विविध वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे ग्रामस्थ सांगतात. यापूर्वीही परिसरात वन्यप्राण्यांकडून पाळीव जनावरांवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने परिसरात तातडीने पिंजरे बसवावेत, तसेच आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी शेतकरी आणि पशुपालकांना विशेष काळजी घ्यावी लागत असल्याने वन विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही होत आहे.