Local Crime Branch : गुटखा-माव्याच्या अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ४लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Local Crime Branch : गुटखा-माव्याच्या अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ४लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
Local Crime Branch : गुटखा-माव्याच्या अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ४लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त
Local Crime Branch : गुटखा-माव्याच्या अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ४लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Local Crime Branch : नगर : जिल्ह्यातील अवैध गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखू विक्री (Illegal Gutkha Sale) विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) धडक कारवाई केली. श्रीरामपूर, शनिशिंगणापूर आणि संगमनेर शहरातील चार ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी (Police) तब्बल ४ लाख ३५ हजार ८५ रुपयांचा गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व मावा जप्त केला.

चार स्वतंत्र गुन्हे दाखल

या कारवाईत सात जणांविरुद्ध चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यातील पाच आरोपी फरार आहेत. याबाबत शाहरूख शहानूर शहा, वय ३१, रा.नवीन घरकुल, वॉर्ड नं.2, श्रीरामपूर), शोएब शेख, रा.मिल्लतनगर, श्रीरामपूर (फरार), अनिल माधव वाघ (रा.तिरमल वस्ती, संभाजीनगर, चारी क्र.4, शनिशिंगणापूर, ता.नेवासा (फरार), वसीम मेहमूद खान, रा.नाईकवाडापुरा, जामा मस्जीद, संगमनेर, ता.संगमनेर (फरार), अझहर दिलावर पठाण, वय ३७, रा.), आत्तु उर्फ आदिब आयुबखान पठाण, पाशा उर्फ फिरदोषखान पठाण, असे यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकांची कारवाई (Local Crime Branch)

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तीन पथके तयार करून जिल्ह्यातील गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यांची माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या.

या पथकांनी २३ ऑगस्ट रोजी श्रीरामपूर शहर, शनिशिंगणापूर आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई केली. श्रीरामपूर शहरातील कारवाईत ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शाहरूख शहानूर शहा (वय ३१) आणि शोएब शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शोएब शेख फरार आहे.


शनिशिंगणापूर येथे २१ हजार ४८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अनिल माधव वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे. संगमनेर शहरात दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. पहिल्या कारवाईत ३६ हजार ७८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वसीम मेहमूद खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तो फरार आहे. दुसऱ्या कारवाईत ६ हजार ८०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अझहर दिलावर पठाण याच्यासह आत्तु उर्फ आदिब आयुबखान पठाण आणि पाशा उर्फ फिरदोषखान पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अझहर पठाण याला ताब्यात घेण्यात आले असून अन्य दोघे फरार आहेत.


ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार भिमराज खर्से, रमिझराजा आत्तार, आजिनाथ पाखरे, बाळासाहेब नागरगोजे, विशाल तनपुरे, रिचर्ड गायकवाड, सागर ससाणे, सुयोग सुपेकर, विकास साळवे, निळकंठ कारखेले, योगेश कर्डिले, सतीष भवर यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here