Parner Police Station : चौकशी होईपर्यंत खेडकर यांची नियंत्रण कक्षात बदली; मुम्मका सुदर्शन यांचा आदेश 

तात्पुरत्या स्वरूपात कामकाज बदलण्याचा आदेश

0
Parner Police Station : चौकशी होईपर्यंत खेडकर यांची नियंत्रण कक्षात बदली; मुम्मका सुदर्शन यांचा आदेश 
Parner Police Station : चौकशी होईपर्यंत खेडकर यांची नियंत्रण कक्षात बदली; मुम्मका सुदर्शन यांचा आदेश 

Parner Police Station : पारनेर : पारनेर पोलीस ठाण्याचे (Parner Police Station) पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्यावर वाळू चोरीच्या प्रकरणात फिर्यादीतून नाव वगळण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप असलेली कथित ध्वनिफीत (Audio Recording) समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत खेडकर यांची अहिल्यानगर नियंत्रण कक्षात बदली करण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Mummaka Sudarshan) यांनी दिले आहेत.

नक्की वाचा : महा रक्तदान शिबिराला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महिलांचाही लक्षणीय सहभाग

तात्पुरत्या स्वरूपात कामकाज बदलण्याचा आदेश

या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विभागीय चौकशी शाखेने आदेश जारी केला आहे.चौकशीच्या अनुषंगाने पुराव्यावर व साक्षीदारांवर कोणताही दबाव अथवा प्रभाव पडू नये,यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ध्वनिफीत प्रसारित झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर खेडकर यांच्याबाबत तात्पुरत्या स्वरूपात कामकाज बदलण्याचा आदेश देण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ध्वनिफीत संपादित व मिश्रित असल्याचा दावा (Parner Police Station)

दरम्यान,पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी ध्वनिफीत संपादित व मिश्रित असल्याचा दावा केला होता. आपण कोणाकडेही पैशांची मागणी केलेली नाही. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या ध्वनिफितीतील संभाषणात फेरफार करण्यात आला असून, सत्य चौकशीत समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. खेडकर यांना अहिल्यानगर येथे तात्पुरत्या स्वरूपात कामकाज पाहण्याचे आदेश देण्यात आले असून, पारनेर पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी पदाचा कार्यभार सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात आला आहे. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.