Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर १९ जणांवर गुन्हा; अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींचा समावेश

अश्लील भाषेचा वापर करण्यात आल्याचा दावा

0
Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर १९ जणांवर गुन्हा; अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींचा समावेश
Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर १९ जणांवर गुन्हा; अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींचा समावेश

Rupali Chakankar : नगर : सोशल मीडिया (Social Media) आणि डिजिटल माध्यमांवर बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरून पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी १९ जणांविरोधात गुन्हा दाखल (Case Registered) केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

नक्की वाचा : चौकशी होईपर्यंत खेडकर यांची नियंत्रण कक्षात बदली; मुम्मका सुदर्शन यांचा आदेश

यांंच्यावर गुन्हा दाखल

गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे, अभिनेत्री दिपाली सय्यद, सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी, डॉ. आशा मिरगे, हनुमंत गलगटे आणि वर्षा कांबळे यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सोशल मीडिया सेलशी संबंधित योगेश सावंत, मोहसीन शेख आणि महादेव बालगुडे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे.चाकणकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नाशिक येथील ईशान्येश्वर महादेव मंदिर ट्रस्टशी संबंधित अशोक खरात यांचा उल्लेख केला आहे. एका सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने खरात यांच्याशी आपली पूर्वी भेट झाली होती, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अश्लील भाषेचा वापर करण्यात आल्याचा दावा (Rupali Chakankar)

खरात याच्यावर पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर त्याच्यासोबतचे जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे. या फोटो-व्हिडिओच्या आधारे आपल्याबाबत चुकीची माहिती पसरवण्यात आल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूबसह विविध डिजिटल माध्यमांवरून आपल्याविरोधात अपमानास्पद मजकूर प्रसिद्ध करण्यात आला. तसेच काही पोस्ट आणि कमेंट्समध्ये शिवीगाळ, धमकी तसेच अश्लील भाषेचा वापर करण्यात आल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे आपली मानहानी झाली असून, सोशल मीडिया कमेंट्सच्या माध्यमातून लैंगिक स्वरूपाचा छळही करण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. संबंधित पोस्ट, व्हिडिओ, कमेंट्स आणि स्क्रीनशॉट्सचे पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

तक्रारीची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावरील संबंधित पोस्ट कोणी तयार केल्या, त्या कोणाकडून प्रसारित झाल्या आणि त्यामागे नेमकी भूमिका कोणाची होती, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.