Students pledge to conserve trees : मवेशीत ११२ झाडांसोबत अनोखे रक्षाबंधन; विद्यार्थ्यांचा वृक्षसंवर्धनाचा संकल्प

Students pledge to conserve trees : मवेशीत ११२ झाडांसोबत अनोखे रक्षाबंधन; विद्यार्थ्यांचा वृक्षसंवर्धनाचा संकल्प

0

Students pledge to conserve trees : अकोले : रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि संरक्षणाच्या वचनाचा सण. याच भावनेला पर्यावरण संवर्धनाची (Environmental conservation) जोड देत मवेशी (ता. अकोले) येथे विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. ऑक्सिजन पार्कमधील तब्बल ११२ झाडांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प (Students pledge to conserve trees) केला.

‘झाडे लावू, झाडे जगवू’ असा संदेश

पर्यावरणप्रेमी राहुल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी झाडांच्या फांद्यांना राखी बांधत ‘झाडे लावू, झाडे जगवू आणि त्यांचे संरक्षण करू’ असा संदेश दिला. भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो, मग आपल्याला प्राणवायू देणाऱ्या, सावली देणाऱ्या आणि पक्ष्यांना आसरा देणाऱ्या झाडांचे रक्षण कोण करणार, हा विचार या उपक्रमामागे होता. वाढते तापमान, घटती हिरवाई, अनियमित पाऊस आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरणाचे संतुलन धोक्यात आले आहे. त्यामुळे केवळ वृक्षलागवड न करता लावलेले प्रत्येक झाड जगविणे आणि त्याची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

Students pledge to conserve trees : मवेशीत ११२ झाडांसोबत अनोखे रक्षाबंधन; विद्यार्थ्यांचा वृक्षसंवर्धनाचा संकल्प
Students pledge to conserve trees : मवेशीत ११२ झाडांसोबत अनोखे रक्षाबंधन; विद्यार्थ्यांचा वृक्षसंवर्धनाचा संकल्प

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

निसर्गाच्या संरक्षणाची जबाबदारी (Students pledge to conserve trees)

‘एक राखी झाडासाठी, एक वचन निसर्गासाठी आणि एक संकल्प पुढच्या पिढीसाठी’ या भावनेतून झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे झाडांशी भावनिक नाते जोडले गेले. झाडांच्या फांदीवर बांधलेली राखी ही केवळ प्रतीकात्मक नसून निसर्गाच्या संरक्षणाची जबाबदारी अधोरेखित करणारी ठरली. यावेळी मुख्याध्यापक वाकचौरे, कलाशिक्षक कातडे आदी उपस्थित होते.