Kotwali Police Station : व्यवसायात भागीदारीचे अमिष दाखवून दहा लाख ६१ हजारांची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Kotwali Police Station : व्यवसायात भागीदारीचे अमिष दाखवून दहा लाख ६१ हजारांची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

Kotwali Police Station : नगर : कचरा गाड्यांच्या मेंटेनन्सच्या व्यवसायात भागीदार करून घेण्याचे आमिष दाखवून हॉटेल व्यावसायिकासह त्यांच्या मित्राकडून १० लाख ६१ हजार रूपये घेतल्यानंतर पैसे परत न करता तसेच व्यवसायात भागीदारी न करता फसवणूक (Fraud) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल (Case Registered) झाला आहे. अविनाश विष्णू कोल्हे (रा. शिवाजीनगर, कराळेवाडी, ता. राहुरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अजिंक्य राजन शेलार (वय ३५, रा. सपना अपार्टमेंट, शिंदे हॉस्पिटलसमोर, बुरूडगाव रोड, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.

भांडवलाची गरज असल्याचे सांगितले

फिर्यादीनुसार, त्यांच्या माळीवाडा बसस्थानकाजवळील हॉटेलमध्ये अविनाश कोल्हे नेहमी येत असल्याने दोघांची ओळख झाली होती. कोल्हे याने आपण अहिल्यानगर महापालिकेच्या कचरा गाड्यांच्या मेंटेनन्सचे काम पाहत असल्याचे सांगितले. या कामासाठी सध्या भांडवलाची गरज असून मेंटेनन्सची बिले मंजूर होण्यास विलंब होत असल्याचे त्याने शेलार यांना सांगितले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

व्यवसायात भागीदारीचे आश्‍वासन (Kotwali Police Station)

मेंटेनन्सच्या कामासाठी पैसे दिल्यास बिलाची रक्कम मिळाल्यानंतर पैसे परत देण्याबरोबरच कचरा गाड्यांच्या मेंटेनन्स व्यवसायात भागीदार करून घेण्याचे आश्‍वासन कोल्हे याने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून शेलार यांनी ७ लाख ११ हजार रूपये कोल्हे याला दिले. तसेच शेलार यांचे मित्र रोहित राजेंद्र बिदे यांच्याकडूनही कोल्हे याने मेंटेनन्सच्या कामासाठी व व्यवसायात भागीदार करून घेण्यासाठी एकूण ३ लाख ५० हजार रूपये घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.