
Stock of counterfeit foreign liquor seized : नगर : भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या (Bhingar Camp Police Station) हद्दीत बनावट लेबल लावलेल्या विदेशी दारू साठ्यावर (Stock of counterfeit foreign liquor seized) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने छापा टाकून एक लाख ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत एकाला ताब्यात घेतली असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव
विजय बलेश्वरसिंह कौशीक (वय ४६, रा. प्लॉट नं. ५, विजयनगर, भिंगार, अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते. ३ सप्टेंबर रोजी पथक भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना, विजय कौशीक याने बनावट लेबल लावलेली विदेशी दारू महेशनगर, बाराबाभळी येथील आलिशा मंझीलच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत ठेवली असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
१ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त (Stock of counterfeit foreign liquor seized)
घराची झडती घेतली असता दारू कंपनीच्या ७५० मिलीच्या १७५ बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांवरील लेबलवर किंमत, बॅच क्रमांक आणि उत्पादन तारीख आढळून आली नाही. त्यामुळे दारूच्या बाटल्यांवर बनावट लेबल लावण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणात कौशीक याला ताब्यात घेऊन दारूच्या बाटल्या व मोबाईल असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा मुद्देमाल त्याने मेहकरी येथील संदिप सानप याच्याकडून घेतल्याचे सांगितले. सानप हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.


