R. Madhavan : वेगाने होणाऱ्या बॉक्स-ऑफिसची (Box-office) चर्चा आणि आर. माधवन (R. Madhavan) सारखा कलाकार कायम वैविध्यपूर्ण भूमिकामुळे चर्चेत असतो आणि त्याने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो भारतीय सिनेमातील सर्वाधिक टिकाऊ पॅन-इंडिया पॉवरहाऊसमधील एक उत्तम अभिनेता आहे ! पॅशन प्रोजेक्ट GDN हा दिग्गज संशोधक जी.डी. नायडू (G.D. Naidu) यांच्या जीवनावर आधारित हृदयस्पर्शी चरित्रात्मक चित्रपट असून तो सध्या थिएटरमध्ये चौथ्या आठवड्यातही दमदार कामगिरी करत आहे.
चित्रपटाने जिंकून घेतलं प्रेक्षकांच मन
7 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या माधवनच्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतलं असून इंडस्ट्रीत सातत्यपूर्ण काम करणारा अभिनेता देखील आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आर माधवन संशोधकाच्या भूमिकेत (R. Madhavan)
आर माधवनसाठी त्याने केवळ या दूरदर्शी संशोधकाची भूमिका साकारली नाही तर सह-निर्माता म्हणून चित्रपटाचे नेतृत्वही केल आहे. हे यश अत्यंत वैयक्तिक आहे. त्या प्रामाणिकपणाचे भरभरून फळ मिळाले आहे.
आर माधवन सांगतो “अनेक गोष्टी भारतीयांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक अडचणीशी लढलेल्या एका व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांची कथा प्रत्येक पिढीसमोर आणण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवला आहे. प्रत्येक कुटुंबे एकत्र बसून हा चित्रपट पाहताना दिसले आणि आता अधिकाधिक विद्यार्थीही त्यांची कथा जाणून घेत आहे हे बघून खूप बर वाटतंय. चार आठवडे उलटूनही थिएटरमध्ये अजूनही प्रत्येक वयोगटातील लोकांची गर्दी आहे ज्यांना जी.डी. नायडूंमध्ये स्वतःचे काहीतरी सापडत आहे. हे असे यश आहे जे तुमच्यासोबत कायम राहते”
निर्माते डॉ. वर्गीस मूलन यांनीही हीच भावना व्यक्त केली आणि माधवन यांच्या स्टार पॉवर आणि बांधिलकीने पिढ्यांमधील दरी भरून काढण्यास कशी मदत केली हे नमूद केले. या चित्रपटाने सर्वांशी – आजी-आजोबा, आई-वडील आणि आता त्यांच्या मुलांशीही – ज्या प्रकारे नाते जोडले आहे, त्याने आम्हाला सर्वाधिक प्रभावित केले आहे. केवळ वर्ड ऑफ माउथच्या जोरावर चौथ्या आठवड्यातही हाऊसफुल सुरू राहणे हे सांगते की या कथेला तिचे हृदय सापडले आहे”
कृष्णकुमार रामकुमार दिग्दर्शित आणि वर्गीस मूलन पिक्चर्स आणि ट्रायकलर फिल्म्स यांच्या संयुक्त निर्मितीतील GDN तमिळनाडू आणि जगभरातील थिएटरमध्ये प्रेक्षकांना भुरळ घालत आहे तर आगामी नेटफ्लिक्स रिलीजमुळे माधवनचा हा पॅशन प्रोजेक्ट जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.



